पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा परिषद कोरोनामुक्त ! सात्त्विक अन्नप्राशन, योग्य व्यायाम व प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास सहजपणे मात करू शकतो- अध्यक्ष क्षीरसागर !! जनतेनेही सोशल डिस्टन्सिंग पाळणे व महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यास कोरोनाला हररविणे अवघड नाही- मुख्य कार्यकारी अधिकारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
     नासिक जिल्हा परिषद कोरोनामुक्त                    नासिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला होता, तत्काळ त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, ते आज कोरोनावर मात्र करून सुखरूप बाहेर पडले. नासिक जिल्हा परिषदेच्या एका संशयित रूग्णामुळे संपूर्ण जिल्हाभरात खळबळ माजली होती, आज या परिस्थितीतून जिल्हा परिषद कोरोनामुक्त झाली.             जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, आपला रोजचा आहार सात्त्विक अर्थात घरगुती आहार व त्यासोबत निवासी व्यायाम केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वाढीस लागते हा कोविड-१९ लागेल हरविण्याचा सर्वात मोठा उपाय आहे यासोबत प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन केले तर कोरोना जिल्हाभरातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.                 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाने वेळोवेळी  केलेल्या विविध उपाययोजना व सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी अंमलात आणतात यामुळे हाॅटस्पाट ठरलेल्या नासिक जिल्ह्याची मातृसंस्था असलेली नासिक

तहसीलदार उपस्थित नव्हते तर प्रांत यांची असहकाराची भूमिका ! अखेर खासदार व पदाधिकाऱ्यांनी निवेदन चिकटविले शासनाच्या वाहनाला !! कुठे घडला असा प्रकार, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस, खासदार भारती पवारांच्या आंदोलनाला निफाड प्रशासनाचे असहकार्य                 नासिक::- आज निफाड येथे भारतीय जनता पार्टी निफाड तालुका तर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नानंबाबत तहसील कार्यालय येथे दिंडोरी लोकसभा खासदार भारती पवार तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, निफाड तालुका अध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, लासलगाव मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डी. के. नाना जगताप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यासाठी गेले असताना मे. तहसीलदार उपस्थित नसल्याने भारती पवार यांनी प्रांत अर्चना पठारे यांना विनंती केली, आम्ही ५ लोक सोशल डिस्टन्स पाळून तुम्हाला निवेदन देणार आहोत, तुम्ही या, असे सांगितले, परंतु त्या त्यांच्या केबिन सोडून निवेदन घेण्यास न आल्याने शेवटी शासनाने दिलेल्या त्यांच्या वाहनास निवेदन चिकटवून निषेध करण्यात आला. एका लोकप्रतिनिधी खासदार यांना अशी वागणूक तर सामान्य जनतेचे सामान्य शेतकऱ्याचे काय ?  हा प्रश्न सर्वसामान्य जनतेस विचार करण्यासारखा आहे. यावेळी मीडिया प्रवक्ता तथा लासलगाव कृषी उत्पन्न बा

अनेक दिवसांपासून गोदावरी नदी ला लागलेलं पानवेलींच ग्रहण आम. बनकरांच्या प्रयत्नाने सुटले ! जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांची प्रतिक्रिया !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, अनेक दिवसांपासून गोदावरी नदी ला लागलेलं पानवेलींच ग्रहण सुटले ! आमदार दिलीपराव बनकर यांच्या पाठपुराव्याला यश पानवेली काढण्यास सोमवार पासून झाली सुरवात             नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या गावांसाठी  आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रयत्नातून  जलसंपदा विभागाच्या वतीने पानवेली काढण्यास सुरवात करण्यात आली आहे.  नागरिक,शेतकरी व पर्यावरण प्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे. नासिक शहरात तून सांड पाणी व कारखान्यातुन गोदावरी नदी पात्रात सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी या मुळे गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते, यामुळे पानवेली तयार होतात. या  पानवेली वाढीचा वेग कमी कालावधीत संपूर्ण गोदावरी चे पात्र व्यापून टाकतात. पानवेली नांदूरमध्यमेश्वर ते शिलापूरच्या जवळपास ३० किलोमीटर पर्यंत गोदेच्या पात्रात दरवर्षी पसरलेल्या असतात, पानवेली  मुळे, जलचर प्राणी मात्राचे अस्तित्व धोक्यात येत असते. तसेच पाणी ही प्रदुषित व  खराब होते. पानवेली लवकर नष्ट होत नाही. पावसाळ्यात पाणवेली अधिक अडसर ठरतात. इगतपुरी-त्रंबके

राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा ! ..................आणि आज कुणीही उठतं आणि एकमेकांवर गलिच्छ पणे गरळ ओकतात, उदाहरणच द्यायचे झाले तर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल या संवैधानिक पदांनाही सोडत नाहीत, बुजगावणे, रबर स्टॅम्प, मौनी, ५६ इंची, चायवाला, कोरोना, टरबुज्या, चंपा, तुझी उंची काय ? चाटुगिरी, झेरॉक्स,  ही काय विशेषणे वापरली म्हणजे जनतेने यांना नेता म्हणायचे ?.................. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा !            "राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा" असं म्हणणं सोपं आहे, त्याचे परिणाम किती अंगलट येतील त्यांचे मोजमाप करता येणे शक्य नाही. येथे मुद्दा असा आहे की प्रस्थापित राजकारणी हे प्रगल्भ गटात मोडतात. त्यांना जे राजकीय बाळकडू मिळालेत, धडे मिळालेत, त्यांच्या पाठीमागे "राजकारण" कसे करावे हे सांगणारे, शिकवणारे व नवतरुणांना राजकारणात आणताना ज्या तरुणांची भरती होत असे ते निवडून, पारखून घेतले जात होते, आजचे चित्र खूप विदारक आहे, लोकशाहीचा गळा घोटणारे वाटायला लागले आहे.          तत्कालीन परिस्थितीत तेव्हाचे नेते काय वागलेत, त्यांनी घेतलेले निर्णय देशासाठी चांगले की मारक ठरले हा विषय नाही मात्र राजकारणात प्रवेश देताना त्यांनी जे निर्णय घेतले ते अपवाद वगळता एक सक्षम नेतृत्व देऊ शकतो असे तरुण वाखाणण्याजोगे होते. अनेक पक्ष, पक्षांचे नेते देशपातळीवरील नवीन नेते घडविण्यासाठी काळजी घेत असत आणि आज त्याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. लुच्चे, लफंगे, भ्रष्टाचारी, घाण, बारीक, जाड, ढेरीवाले, खपाट ही विशेषणे तेव्ह

आरोग्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
              नासिक , दि .२५::- नंदुरबार जिल्हा परिषद, नंदूरबार अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी हरीचंद्र टिकाराम कोकणी, बटेसिंग नगर खांडबारा तालुका, नवापूर, जिल्हा नंदूरबार याने  ७५६५०/- रुपयांची लाचेची मागणी करून ५००००/- रुपये लाच स्वीकारली असता लाचलुचपत विभाग नासिक अंतर्गत नंदुरबार युनिट यांनी रंगेहात अटक केली आहे. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार केली होती. तक्रारदार यांचे कुटूंबाच्या मालकीचे शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेन्टर नवापूर येथे असून त्याची कायदेशीर नोंद झाली आहे.  शासकीय योजनेअंतर्गत गरोदर मातां-पेशंट कडून तपासणी केल्यानंतर मोबदला न घेता  शासकीय दर प्रति पेशंट ४००/- रुपये या मानधनावर तपासणी करण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे नमुद कार्यालयाचे  लोकसेवक आरोपी डॉक्टर हरीचंद्र कोकणी यांनी प्रत्येक पेशंट मागे रुपये ५०/- प्रमाणे एकूण ७५६५०/- रुपयांची ची मागणी करून तडजोडी अंती रुपये ५००००/- ची लाच नवापूर येथे पंच व साक्षीदार यांच्या समक्ष मागणी केली  म्हणून गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई शिरिष जाधव पोलीस उप अधिक्षक, नंदूरबार युनिट, पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, व  सहक

संपादकीय, नासिक ते दिल्ली एक शोकांतिका !! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो "विश्वस्त" यात जागा होईल त्याला जनता आजही "नेता", "हिरो" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी "टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार". जनतेच्या उद्रेकाची...............!!! न्यूज मसालाचा अंक व विविध बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय नासिक ते दिल्ली एक शोकांतिका ! जागतिक महामारी ने जगात थैमान घातले आहे, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे, अब्जावधी जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लग्न, वाढदिवस, अंत्ययात्रा तसेच वरीष्ठ-कनिष्ठ सभागृहांच्या सभा रद्द केल्या जात आहेत, भारताला शेजारी देशांशी लढायची वेळ आली आहे आणि......          नासिक महानगरपालिका, नासिक जिल्हा परिषद आॅनलाईन का होईना सभा घेत आहेत जेव्हा केंद्रीय अधिवेशन स्थगित केले जाते, महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन फक्त दोन दिवस घेण्याची तयारी सुरू आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा घेण्याचा अट्टहास का ? विषय कोणताही असो पण जिथे टक्केवारी बाबत तोंड उघडले जाते याचा जर सर्वसामान्य जनतेने जाब विचारला तर राज्यकर्ते वा विरोधक किती तोंड लपवत फिरतील याची जाणीव नसावी यासारखे सुदैव की दुर्देव हे नियंत्यालाच माहीत. निवडून आलेल्या सदस्यांना "विश्वस्त" म्हणतात याचाही विसर पडतो काय ? जनतेला मुर्दाड समजण्याची चूक करणाऱ्यांबाबत जनतेनेच सुधारणा केली तर चित्र खूप वेगळं असेल ! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार

कौतुकास्पद !! शेतकरी पुत्र प्रमोद सावंत यांनी नायब तहसीलदार पदाला घातली गवसणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी निफाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस           नासिक, निफाड::- नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे. चांदोरी गांवचे नाव रोशन  केल्याने चांदोरी गावासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. प्रमोद ने  आपले प्राथमिक शिक्षण चांदोरी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले, त्यानंतर पदवी साठी त्यानी अभियांत्रिकी विभागात मुंबई येथे पदवी व पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या अभ्यासा सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला त्यात सलग चार वर्ष त्यांनी पूर्व परीक्षा पार करत मुख्य परीक्षेस पात्र झाले, त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यास सुरु केला, पहिल्याच प्रयत्नात २०१९ मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार पदाला पात्र ठरला  आहे. त्यांनी नाशिक व दिल्ली येथे वाचनालयात जाऊन अभ्यास केला आहे. प्रमोद चे वडील निवृत्ती सावंत हे  शेतकरी व आई मंगल गृहिणी आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चांदोरी ग्राम

ग्रामपंचायतींशी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधणे सुरू ! राज्यातील पहीलाच उपक्रम कुठे अंमलात आणला गेला !! जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतींशी संवाद साधणे सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातुन सरपंच,उप सरपंच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला जात असून कोरोनाबाबत तसेच विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशाप्रकारे थेट ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी ऑनलाईनद्वारे संवाद साधण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून याद्वारे कोरोनाबाबत उपाययोजना तसेच लॉकडाउनमुळे रखडलेली विविध विकासकामे पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमतीलीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. दररोज दोन किंवा तीन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी  विडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन संपर्क करण्यात येत असून यामध्ये विविध विषयांचा आढावा तसेच मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग

टोकाचा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करा !! निसर्ग सुद्धा कोरोना च्या निमित्ताने हेच तर सांगत नसावा ना ! एन.के.मोरे , राजाजी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन. के. मोरे, राजाजी आत्महत्या करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा,,,,,,                    कोरोना च्या महामारीत सर्व जगावर संकट आले आहे,,आपल्याच भारत देशात नव्हे तर चीन सारख्या देशात भूकबळी ने लोक मरतात आहे,,आत्महत्या करण्यापूर्वी एक वेळ  आपल्या पेक्षा ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांच्या कडे बघा,,,आज झोडपट्टीत राहणारे रस्त्याच्या कडेला राहणारे लोकांकडे बघा , त्याना चिंता नाही का उद्याची,,,,रोजंदारीवर जाणारे, हॉटेल मध्ये काम करणारे, धुनी भांडी करणारे, ही माणसे नाही का? त्यांना पण भविष्याची चिंता नसेल का, त्यांना कोरोनाची भीती वाटत नसेल का, पण तरीही बघा त्यांच्या कडे किती आनंदात जे काही रोज मिळते त्या वर गुजराण करीत आहेत,,, पण ते विचार नाही करत आत्महत्या करण्याचे, या फोटो मध्ये जे दोघे जण दिसतात, ते गिरणारे जवळील धोंडे गावातील आहेत हिरामण खाडे व त्याचा मेव्हणा आज सकाळी ५ वाजता घर सोडून कामासाठी नाशिक ला आले, माझ्या बंगल्यातील नारळाच्या झाडावरील नारळ उतरवून दिले त्यात दोन तीन तास त्यांचे गेले, मजुरी ६०० रु., मिळाली शेजारील पाटील काकू व डॉ शिवदे यांच्या कडील नारळ काढून दिले दोन्ही म

राजीव खंडेलवाल लिखीत ! ‘‘जांबाज शहीदों को देश का सलाम‘‘ अधिक जानकारी के लिये नीचे दी गयी लिंक को क्लिक करें !!!

इमेज
‘‘जांबाज शहीदों को देश का सलाम‘‘ राजीव खंडेलवाल                                                                                         (लेखक वरिष्ठ कर सलाहकार )                                                                                                                                                                                                                                          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा राजनीतिक पार्टियों की सर्वदलीय बुलाई गई बैठक में गलवान घाटी में शहीद हुये 20 जाबाजों की घटना के बाबत आवश्यक जानकारी दी गई। प्रधानमंत्री ने स्पष्ट शब्दों में यह कहा कि गलवान घाटी में हमारी सीमा में न तो कोई घुसा है और न ही घुसा हुआ है और न ही हमारी कोई ‘‘पोस्ट’’ किसी दूसरे के कब्जे में है। प्रधानमंत्री के उक्त कथन का राष्ट्रीय हित में न केवल स्वागत किया जाना चाहिए, बल्कि उस पर कोई शक की गुंजाइश किये बिना, उन्हें इस बात के लिये बधाई भी दी जानी चाहिए कि उन्होंने अपने उस कथन को सही सिद्ध कर दिखाया कि भारत की एक इंच भूमि पर भी किसी शत्रु देश का कब्जा नह

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणपत्रकाचे केले वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड, यांजकडून निफाड तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप.                 नासिक::-महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि.३० सप्टेंबर २०१९  रोजी थकीत असलेल्या व दि.०१ एप्रिल २०१५ ते दि.३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्याची  घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरुवात झालेली असून त्याचा शुभारंभ निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत असून प्रमाणपत्र पात्र झालेल्या शेतकरी सभासदांना शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण करताना सोप्या

आज होणाऱ्या सुर्यग्रहणाचे राशीनुसार फल काय आहे ! जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कंकणाकृती सूर्यग्रहण रविवार दि. २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, दक्षिण युरोपचा काही भाग आणि आॅस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशांमध्ये ग्रहण दिसणार आहे. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच रेषेत येतात तेव्हा जी आकाशिय स्थिती निर्माण होते तिला सुर्यग्रहण म्हणतात, पृथ्वीपासून चंद्र कमाल अंतरावर असतो तेव्हा कंकणाकृती ग्रहण म्हटले जाते, राजस्थान, पंजाब, हरियाना व उत्तराखंडातील काही प्रदेशात कंकणाकृती अवस्था पाहाण्यास मिळेल. पृथ्वीपासून किमान अंतरावर चंद्र असल्यास खग्रास सूर्यग्रहण होते, यांत सूर्य पुर्णपणे झाकला जातो,  शनिवार दि. २० जून रोजी रात्री १० पासुन ते ग्रहण मोक्षापर्यत अर्थात भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० ते २:०७. (वेगवेगळ्या ठिकाणांहून मोक्षवेळेत बदल राहील)  वेध पाळावेत. बाल, वृध्द, आजारी, अशक्तव्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी रविवारी पहाटे ४ वा.४५ मि.पासुन ग्रहण मोक्षापर्यत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म , देवपुजा, श्राध्द, ही कर्मे करता येतात तर काहींच्या मते ही कर्मे वर्ज मानली जातात. वेधकाळा

 सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......! माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करणाऱ्या सैनी जोती च्या कुणाची वर्णी लागली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
विजय राऊत यांची सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......               नाशिक:  देशभरातील माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करण्याचे काम सैनी जोती महासंघ करत आहे. या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रामधून विजय राऊत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.         माळी समाजाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाज संघटनाच्या माध्यमातून राज्यभरात कामाचा वेगळा ठसा उमटवला असल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्साहात पार पडली असून या बैठकीमध्ये देशातील विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये समाजाच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सैनी जोती महासंघाचा देशभरात दौरा करण्यात येणार असल्याची माहिती विजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. ब्रिजेश ट्विकल सैनी, संवरक्षक ताराचंद गेहलोत, मोतीबाब साखला, उत्तराखंड धर्मवीर सैनी, मुरली बालन, महेश सैनी मध्यप्रदेश, मुन्नालाल सैनी छत्तीसगड,

शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेला कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट ! तरूणांकडून आदर्शाची रुजवणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस _____________________________________ शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी रायतेवस्ती शाळेला कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट, विकास रायते व संतोष रहाणे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम             निफाड::-  तालुक्यातील उत्तर पुर्व पट्ट्यातील खडकमाळेगाव येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती शाळेस जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते व शिक्षणप्रेमी तरूण संतोष रहाणे यांनी "माझा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत" या उपक्रमातंर्गत वाढदिवसानिमित्त थर्मल स्कॕनर, हँड फ्री सॕनिटायझर स्टँड भेट दिले तर बालरोगतज्ञ डॉ.मंगेश रायते यांनी सर्व विद्यार्थ्यांना मास्क भेट दिले.          १५ जुन रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात कधी सुरू याबाबत अनिश्चितता आहे परंतु शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता लक्षात घेत साहित्य भेट दिले.          गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद असल्याकारणाने शाळा निर्जंतुकीकरणासा

जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव !                नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.       नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात ! न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त

कोविड-१९ वर मात केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक  : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.  आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी निफाड, येवला, चांदवड  व मनमाड येथे भेट देवून त्यांनी कोरोनाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मनमाड येथील कोव्हीड-१९ केअर सेंटरला भेट देवून कोव्हीड आजारातून बरे झालेल्या ९ रुग्णांचे लीना बनसोड यांनी गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले. आजारातून बरे झाल्याने या रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांना आठवडयातून दोनदा भेट देऊन तापाची तसेच रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.        ग्रामीण पातळीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध् उपाययोजना करण्यात येत आहेत. हॉटस्पॉट असलेल्या ८ ठिकाणी जिल्हास्तरावरून संपर्क अधिका-यांची नियुक्ती करुन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या,  अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती, पाणी पुर

चमचे पत्रकार !खरंच पत्रकार चमचे असतात का ? चमचे असतील तर त्यांना पत्रकार म्हणावे का ? चमचेगिरी पत्रकार करतात असे असेल तर पत्रकारितचे काय होईल ? आणि असं जर खरं मानले तर एखाद्याची आत्महत्या होऊ शकते का ? ,,,,,,,,,,,,,,, वाचा, न्यूज मसाला चे आजचे संपादकीय ! सविस्तर वाचण्यासाठी व बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
चमचे पत्रकार ! खरंच पत्रकार चमचे असतात का ? चमचे असतील तर त्यांना पत्रकार म्हणावे का ? चमचेगिरी पत्रकार करतात असे असेल तर पत्रकारितचे काय होईल ? आणि असं जर खरं मानले तर एखाद्याची आत्महत्या होऊ शकते का ? ,,,,,,,,,,,,,,, वाचा, न्यूज मसाला चे आजचे संपादकीय

सहाय्यक अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सहाय्यक अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात ! पंचायत समिती बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता आज दि. १७ जून २०२० रोजी लाचलुचपत विभागाच्या यशस्वी सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आला.          शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ईश्र्वर सखाराम पटेल याने ठेकेदाराचे बील मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. ठेकेदाराने तातुक्यातील टेंभली पेसा अंतर्गत होळगुजरी गृप ग्रामपंचायत येथील मुतारी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हाळ तसेच त्यानुषंगीत कामांचे सहा लाख त्रेचाळीस हजारांचे काम पूर्ण केले होते त्यातील ५ लाख ४३ हजारांचे बीलाचे फाईलवर सहाय्यक अभियंता ईश्र्वर पटेल याने स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच आज दि. १७ जून २०२० रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात पंच साक्षीदारांसमक्ष स्विकारली असता लाचलुचपत विभागाच्या वतीने रंगेहाथ पकडण्यात आले.          सदर कारवाई पो. उप अधीक्षक शिरीष जाधव, पो. निरिक्षक जयपाल अहीरराव, हेकाॅ. उत्तम महाजन, संजय गुमाणे, पो. ना. दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहीरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली व गुन्हा दाखल करण्यात आ

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ संवर्गांतील ३१८ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ६ संवर्गांतील ३१८ कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. एकाचवेळी ३१८ कर्मचा-यांचा लाभ मंजुर केल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये समाधान व्यकत करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गिय संघटनांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत १० वर्ष सेवा झाल्यावर पहिला, २० वर्ष सेवा झाल्यावर दुसरा तर ३० वर्ष सेवा झाल्यावर तिसरा लाभ देण्यात येतो. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागांतर्गत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तीसरा  लाभ मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये परिचर २३६, कनिष्ठ सहाय्यक ६०, कनिष्ठ प्रशासन अधिकारी  १०, सहाय्यक प्रशासन अधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ५, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ४ , परिचर यांना लाभ मंजुर करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली. विहित वेळेत पारदर्शक

चौकशी समिती पुढील आव्हाने !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
चौकशी समिती पुढील आव्हाने !! प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाय राबविण्यात येत असतात, मात्र राजकीय, आर्थिक हितसंबंध जोपासत प्रशासकीय यंत्रणेचा बळी दिला जातो, या बळींमध्ये सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आढळून येते, यांत अन्याय होऊ नये म्हणून चौकशी समिती गठीत करण्यात येतात, चौकशी समित्याही किती निष्पक्षपणे काम करतात हाही संशोधनाचा विषय आहे. याला नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या अपवादात्मक ठरताना दिसत आहेत. एक तपाहून अधिकचा काळ त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. अशा अधिकाऱ्यांची तळमळ समाजासाठी निश्र्चितच लाभदायक ठरते. असे अनेक अधिकारी आजमितीस प्रशासनात आहेत, त्यांना प्रशासनातील इतर घटकांचे आवश्यक पाठबळ लाभले तर विकासाची कास धरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय विभागांचे कार्य कौतुकास्पद होईल, मात्र प्रशासनवरील राजकीय पकड ही अनैतिक कामासाठी जास्त वापरात येते याचाच फटका शहराला, जिल्ह्याला, राज्याला परिणामी देशाला बसतो, गेल्याच आठवड्यात नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका स