तब्बल १२० अनुकंपा धारकांना समक्ष बोलावून समुपदेननाने नियुक्ती ! कौतुकास्पद- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेले प्रयत्न व प्रशासनाने घेतलेले परिश्रम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा अंतर्गत १२० अनुकंपाधारकांना समक्ष बोलावून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिचर, आरोग्य सहाय्यक, स्थापत्य अभियंता, शिक्षण सेवक, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदांवर सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनुकंपा अंतर्गत १२० उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये परिचर पदावर ४६, ग्रामसेवक पदावर १९, शिक्षण सेवक पदावर १२, पर्यवेक्षिका पदावर १, आरोग्य सेवक पदावर २८, आरोग्य सेविका १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, पशुधन पर्यवेक्षक २, स्थापत्य अभियंता सहाय्यक ५, कनिष्ठ अभियंता २ व विस्तार अधिकारी कृषी १ अशा ११८ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून २ पदांवर नियुक्ती आदेश देणे बाकी असल्याची माहिती सामान्य प्रशा...