ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- आलोसे हंसराज श्रावण बंजारा, ग्रामसेवक, वर्ग ३, नेमणूक ग्रामपंचायत कार्यालय अधरवड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार यांच्या भावाचे रमाई घरकुल आवास योजनेसाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करून घरकुलाची मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तसेच यापुढेही नमुद घरकुलासाठी शासनाकडून मिळणाऱ्या रकमेचे हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर लवकर जमा करण्यासाठी ५०००/- रुपये पंच साक्षीदारासमक्ष लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम ५०००/- रुपये पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो.हवा. पंकज पळशीकर, पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना.प्रभाकर गवळी, पो.ना. नितिन कराड, चालक परशुराम जाधव यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस. न्याहाळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशि