जयपुर फूटसाठी नावनोंदणीचे आवाहन !
जयपुर फूटसाठी नावनोंदणीचे आवाहन ! नाशिक ( प्रतिनिधी ) प.पू.आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी यांच्या पुण्यतिथि व उत्तर भारतीय प्रवर्तक प. पू. श्री आशीष मुनिजी यांच्या जन्मदिवसानिमित्त श्री नवकार आशीष सेवा ट्रस्ट, साधुवासवानी मिशन पुणे, निवासी अपंग कल्याण केंद्र सटाणा, बागलाण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना विनामूल्य कृत्रीम अवयव ( जयपूर हात, पाय) बसविण्यासाठी सटाणा येथे दि.२६ मार्च रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील गरजू रुग्ण त्यात सहभागी होऊ शकतील. या शिबीराअंतर्गत कृत्रीम अवयव बसविण्यासाठी गरजुंनी बुधवार दि.१५ मार्च पर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. रविवारी दि.२६ मार्च रोजी सटाणा येथे बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सकाळी ९ पासून तज्ज्ञांकडून प्रत्यक्षात माप घेतले जाईल. हे शिबीर पूर्णपणे विनामूल्य असुन जास्तीत जास्त गरजुंनी या ऊपक्रमात सहभागी होऊन अपंगत्वावर मात करावी. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी निलेश जे.भंडारी यांच्याशी ९८५०९०५७६७ या क्रमांकावर संपर्क साधाव...