पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन !

इमेज
माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे   रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन       नाशिक :- माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'वळणवाट' या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि.१जानेवारी रोजी) सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.      सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आमदार डॉ.सुधीर तांबे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रकाशक विलास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करणार आहेत.      सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन संस्थेने केले आहे.

खासदाराच्या अटकेसाठी शासकीय कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने ! कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करण्याचा इशारा !

इमेज
खासदाराच्या अटकेसाठी शासकीय कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने ! कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करण्याचा इशारा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे नेते आणि दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला तसेच सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबून ठार करण्याचा कट करणारे व वरिष्ठ महिला अधिकारी यांना लज्जा वाटेल अशा शब्दांत शिवीगाळ व अपशब्द वापरल्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये तृतीयश्रेणी, चतुर्थश्रेणी व परिचारिका वर्गातील कर्मचार्‍यांनी दुपारी तीव्र निदर्शने केली. यानंतरही कारवाई न झाल्यास मात्र सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संप करून कामकाज बंद करण्याचा आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहिल, असा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला आहे.  राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मुंबईत कामा रुग्णालयात ही निदर्शने करण्यात आली तर अन्यत्र महाराष्ट्रातील स

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !

इमेज
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !          नाशिक - वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) रावसाहेब थोरात सहभागृहात पार पडले. त्यावेळी राज्य दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे. समवेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे, संमेलन उद्घघाटक ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, तसेच डॉ. लक्षराज सानप, मुंबई येथील डॉ. विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

प्रवाशांची प्रीमियम प्रवासाला पसंती !आजपासून (रविवार २५ डिसेंबर) आणखी तीन मार्गावर सेवा, लोकेश चंद्र यांची माहिती

इमेज
प्रवाशांची प्रीमियम प्रवासाला पसंती ! आजपासून (रविवार २५ डिसेंबर) आणखी तीन मार्गावर सेवा, लोकेश चंद्र यांची माहिती            मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत ई- वातानुकूलित प्रीमियम बसेस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रीमियम बसने रोज ३०० प्रवासी लक्झरी प्रवास करत असून, ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रीमियम बसेसना प्रवासी पसंती देत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. दरम्यान, प्रीमियम बस सेवेला पसंती बघता २५ डिसेंबरपासून आणखी तीन मार्गांवर सेवा सुरू करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.          ओला-उबेरपेक्षा स्वस्त, आरामदायी, गारेगार प्रवास करता यावा म्हणून बेस्ट उपक्रमाने प्रीमियम बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. ठाणे ते बीकेसी व वांद्रे स्थानक पूर्व ते बोकेसी दरम्यान, १२ डिसेंबरपासून प्रीमियम बससेवा प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावू लागली आहे. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान एक हजारांहून अधिक प्रवाशांनी प

शेकोटी संमेलनातून होणार लोककलेचा जागर- डॉ. शंकर बोऱ्हाडे

इमेज
शेकोटी संमेलनातून होणार लोककलेचा जागर- डॉ. शंकर बोऱ्हाडे              नाशिक (प्रतिनिधी) साहित्य आणि संस्कृतीचा नाशिकला जसा वारसा आहे तसाच तो लोककलेचाही आहे.नाशिकने जसे साहित्याला साहित्यिक दिले तसेच शाहीर आणि लोककलावंतही दिलेत. बदलत्या काळात मात्र लोककला हळूहळू लोप पावतील की काय अशी भीती वाटत असते पण गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. आपल्या नियोजनबद्ध आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरणा गौरव प्रतिष्ठानने नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या शेकोटी संमेलनाचे आयोजन केले असून या संमेलनातून लोककलांचा जागर होणार आहे. या पहिल्या वहिल्या साहित्यसंमेलनाचा मी अध्यक्ष असल्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. ते भावबंधन मंगल कार्यालयात शेकोटी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याच्या प्रित्यर्थ आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते. मंचावर शेकोटी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आर्कि. बाळासाहेब मगर, सावाना चे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अ

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

इमेज
मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !         मुंबई (प्रतिनिधी)::- दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय, मुंबई विभाग व श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य (रजि) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मूर्तिकार कारागीर कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा' पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.            कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप सिद्धे गुरुजी तसेच श्रमिक बोर्डाचे राष्ट्रीय सदस्य सुधाकर अपराज, सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र पुरोहित, स्वावलंबी भारत अभियानाचे संदीप देशपांडे. कौशल्य विकास तज्ञ विनायक जोगळेकर तसेच संघटनेच्या पदाधिकारी आणि सर्व उपस्थितांच्या साक्षीने झाले.           कार्यक्रमाची सुरुवात संदीप सिद्धे गुरुजी यांच्या मनोगताने झाली. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणेश मूर्ती कशी घडवावी याबद्दल त्यांनी माहिती दिली. विभागीय संचालक चंद्रसेन जगताप यांनी लघूकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश व बोर्डाची माहिती दिली. तसेच

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ !

इमेज
राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उभ्या महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारी २०२३ महिन्यापासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे.         लिहित्या हातांना प्रोत्साहन देण्यासाठी व नवोदित गझलकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, ह्या उदात्त हेतूने गझल मंथन साहित्य संस्था दरवर्षी गझल लेखन महास्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेच्या माध्यमातून संस्थेने आजपर्यंत अनेक गझलकारांना नावारूपास आणले आहे. हा उपक्रम पुढे निरंतर सुरू राहावा म्हणून संस्थेतर्फे चौथ्या पर्वाला जानेवारी महिन्यापासून प्रारंभ करण्यात येत आहे. ही स्पर्धा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून ऑनलाईन घेतली जाणार आहे. महास्पर्धेचे नियम असे आहेत. दर महिन्याच्या ३० तारखेला स्पर्धा घेण्यात येईल. एकूण बारा फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक महिन्याला वेगळे वृत्त असेल आणि सुप्रसिद्ध गझलकारांकडून

शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !

इमेज
शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !         नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी (१४ रोजी ) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समिती सुरगाणा येथे आढावा बैठक घेतली. पंचायत समिती सुरगाणाच्या वतीने यावेळी सरपंच संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गट विकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी नागरिकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांनी देखील पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय यंत्रणा सुरगाणा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले.       उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सरपंच संवाद कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे कामकाज, योजना, ग्रामपंचायतींना मिळणारा ५% बंधित आबंधित नि

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान; सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत- मोहन वाघ

इमेज
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान;  सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत- मोहन वाघ                                      नाशिक १४,(जिमाका वृत्तसेवा)::- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.         या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२२-२३ अंतर्गत पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जावू नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग होण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाची योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी स्वखर्चाने किंवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केल्या

आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

इमेज
आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !        नाशिक: (दि. 12) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - २०२२ अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. १३ डिसेंबर २०२२ पासून प्रारंभ होत आहे.          विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र - २०२२ मधील परीक्षा राज्यातील एकूण १७१ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे ४६००० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा ३० डिसेंबर २०२२ पर्यंत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.          हिवाळी सत्र - २०२२ परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे  First Year MBBS (Old) Supplementary, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTh, BOTh,  P.B.B.Sc ., Basic B.Sc., B.P.O., BASLP, व PG - DM, MCh, M.D.S., Diploma Dentistry, MD/MS Ayurveda & Unani, MD Homoeopathy, Diploma Ayurveda, MOTh, MASLP, M.Sc. (Aud.), M.Sc. (SLP), MPO तसेच University Courses – BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH (N), MBA, M.Phil

वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद

इमेज
वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद !        नाशिक ( प्रतिनिधी) "वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही. वेदांचे सामर्थ्य अतर्क्य व मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचे आहे." असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख स्वामी तेजोमयानंद यांनी केले. ते दत्तजयंती निमित्त शंकराचार्य सभागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिन्मय मिशनचे नाशिक आश्रमाचे प्रमुख स्वामी अद्वैतानंद, पपू मोहन महाराज गाणगापूरकर उपस्थित होते. यावेळी प्रभा आठवले यांनी लिहिलेल्या श्री गुरुचरित्र सारायण या सात खंडातील ग्रंथाचे गुरूंना अर्पण करण्यात आले.        स्वामीजी पुढे म्हणाले, "वेद म्हणजे ज्ञान भांडार. आपण एखादा विषय शिकतो ते प्रत्येक शास्त्र खूप मोठे. त्या सर्वांचा साठा म्हणजे वेद होय. असा कोणताच विषय नाही जो वेदात नाही. वेद हे श्वासाप्रमाणे भगवानांकडून प्रकट झाले. वेद अभ्यास कठीण असल्याने रामायण, महाभारत निर्माण झाले, गीता निर्माण झाले. गुरुचरित्र वाचा. मनुष्यदेहाचा उपयोग कसा करावा यासाठीचे बुकलेट म्हणजे वेद. ज्या विषयाचे ज्ञान प्रत्यक्ष किंवा प्रमाण याद्वारे होऊ शकत

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचाकॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा कॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !      मुंबई (प्रतिनिधी)::- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी कॅपजेमिनी सॉफ्टवेअरने करार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.          विद्यार्थ्यांची निवड तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कॅपजेमिनीच्या तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकी कार्यबलाचा भाग बनण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना उद्योगासाठी तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे जी काळाची गरज आहे, असे विचार प्रतिष्ठानचे सरचिटणीस आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !

इमेज
अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर -मुंबई या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झालं.      शिक्षकी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या जीवनाचा उर्वरीत काळ त्यांनी कीर्तन संस्थेला दिला.कीर्तनसंस्थेचा आर्थिक तसेच सर्व प्रकारचा कारभार त्यांनी निस्पृहपणे चोखपणे सांभाळला. उत्तम वक्तृत्व , शिस्तप्रिय आणि  मोत्यासारखे सुंदर अक्षर , सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत , एका ओळीत सुबक पणे सर लिहीत. आजपर्यंत अनेक कीर्तनकार घडवण्यात तसेच कीर्तन संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम त्यांनी राबवले. आजारपणात सुद्धा कीर्तन संस्थेचाच विचार त्यांच्या मनात होता. संस्थेच्या आणि त्यांच्याशी निगडित संस्थाच्या वतीने २० डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात द ल वैद्य मार्ग दादर येथे शोकसभेचे आयोजन केले असल्याचं प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी यांनी सांगितले

स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !

इमेज
स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !          नाशिक (प्रतिनिधी) देशात आणि जगभरात कार्यरत असलेल्या चिन्मय मिशनचे परमपूज्य स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संग कार्यक्रम शनिवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता पंचवटी चिंचबन येथील आश्रमात करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहून त्यांच्या सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन अश्रामातर्फे करण्यात आले आहे. स्वामी तेजोमयानंद हे १९९४ ते २०१४ दरम्यान चिन्मय मिशनचे प्रमुख होते. नंतर २०१७ पासून स्वामी स्वरूपानंद हे चिन्मय मिशनचे प्रमुख आहेत. त्यांना २०१६ मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देवून भारत सरकारने गौरविले आहे. ते कोईमतूर येथील चिन्मय सेंटर ऑफ वर्ल्ड अंडरस्टान्डींग, दिल्ली, चिन्मय इंटरनशनल स्कूलचे देखील प्रमुख आहेत. याबरोबरच त्यांनी वेदांत तत्वज्ञानावर शंभरावर पुस्तके लिहिली आहेत. बऱ्याच काळानंतर तेजोमयानंद यांचे नाशिकमध्ये आगमन होत असून या सत्संगास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चिन्मय मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.  

जिल्हा परिषद शाळेत होणार "विनोबा" ऍपचा वापर !जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार !

इमेज
जिल्हा परिषद शाळेत होणार "विनोबा" ऍपचा वापर ! जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार !      नाशिक : जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी "विनोबा ऍपचा" वापर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी ओपन लिंक्स फाउंडेशनकडून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांशी निगडित सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन हे विनोबा नावाच्या ऍप मध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ओपन लिंक्स फाऊंडेशन चे संजय दालमिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.     आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायक ऍप           शिक्षणाच्या अनुभव बाबतीत शाळेतील ९०% विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो. "विनोबा" हा एक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ऍप आहे. भारतामध्ये उच्च गुणवत्तेवर आधारीत K -१०  शिक्षण पध्द्ती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.  शिक्षकांचा दैंनदिन कामात

गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!

इमेज
गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!           नाशिक- गुजरात विधानसभा निवडणूकीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२ जागांपैकी १५६ पेक्षा अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय  मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.             या जल्लोषाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमण, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू, काशिनाथ शिलेदार, अरुण शेंदुर्णीकर, सागर धर्माधिकारी, सुरेश पाटील, चंद्रकांत थोरात, फिरोज शेख, माधवी पढार, विजय बनछोडे, शाहिन मिर्झा , शिवाजी गांगुर्डे,  प्रा.कुणाल वाघ, रुची कुंभारकर, हेमंत शुक्ल, चारुदत्त आहेर, सुनिल देसाई, विश्वास पारनेरकर, राकेश पाटील, सोनल दगडे, धनंजय पळसेकर, उदय जोशी, वसंत उशीर, विनायक कस्तुरे, सोनाली कुलकर्णी, सुशमा गोराणे, सुरेश पिंगळे

बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर !शासनाने सहकार्य करावे ही माफक अपेक्षा !!

इमेज
बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर ! शासनाने सहकार्य करावे ही माफक अपेक्षा !!       नाशिक ( प्रतिनिधी ) सध्या निराधार, बेवारस बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनी शहर परिसर हादरुन गेला आहे. नुकताच बाल लैंगिक शोषण प्रतिबंध दिन झाला. आज (दि.३) जागतिक दिव्यांग दिन आहे. घारपुरे घाटाजवळच्या आधाराश्रम संस्थेत वयोमर्यादा पूर्ण केलेली १० बहुविकलांग बालके असून त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना नियमानुसार योग्य संस्थेत दाखल करण्याची गरज आहे. यानिमित्ताने हे मंथन.    नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था गेली ६८ वर्षे निराधार बालकांना आधार देऊन त्यांच्या संगोपनाचे, पुनर्वसन करण्याचे काम करते. मातापित्यांनी टाकून दिलेली, अनौरस, एकल पालकांची तसेच बेवारस आढळलेली बालके जिल्हा रुग्णालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा बालकल्याण समिती या संस्थांच्या मार्फत कायदेशीर प्रक्रिया करून आधाराश्रमात दाखल होतात. एक दिवस ते ६ वर्षे वयाचे ३० मुलगे तर एक दिवस ते १२ वर्षे वयाच्या ९० मुली सध्या येथे आहेत. या आकड्यांवरून अजूनही समाजात मुलींना स्वीकारण्याचा दृष्टिकोन किती संकुचित, नकारात्मक व अपरिपक्व आहे हे लक्षात येते. आ

श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला ! नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !

इमेज
श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला !  नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !     नाशिक::- येथील रामदेवजी भक्त परिवारातर्फे ‘ श्री बाबा रामदेवजी यांचा विशाल जम्मा जागरण’ कार्यक्रम सोमवार ५ डिसेंबर २२ रोजी दुपारी १ वाजेपासून ते रात्रीपर्यंत धनदाई लॉन्स येथे आयोजित केला आहे. हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशिल गोपल बजाज हे हा कार्यक्रम सादर करणार आहे.        या कार्यक्रमात दुपार पासून होम हवन, अखंडज्योत, भजन, जन्म वृत्तांत, कथा ब्यावला, महाप्रसादी व महाआरती होणार आहे.  तर या कार्यक्रमाचे आयोजन समिती तर्फे स्वप्नील जैन, रुपाली गौड, तृप्ती जैन, संजय लोढा, प्रा. सीए. लोकेश पारख, नंदकिशोर हरकुट, सचिन कोठारी हे विशेष परिश्रम घेत आहे.         या जम्मा जागरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामदेवजी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

इमेज
सदाचारी बनो जीवन में आगे बढो !    नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी  दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.        आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व  आहे.आजच्या आधुनिक  आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

इमेज
महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतावर मागील अनेक शतकांत विविध परकीय शक्तींनी आक्रमण केले तरीही आपण कायमच देश म्हणून अखंड राहिलो. संस्कृती, आहार, विचारात विविधता असूनही एवढा मोठा खंडप्राय देश म्हणून कसा टिकला, याचे आश्चर्य वाटते, पण अनेक आक्रमणानंतरही भारताला काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांनी एकत्र जोडून ठेवले, ही साहित्याची ताकद असून ते अमोघ आहे, जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही. भारताचा एकच धर्म तो म्हणजे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेला मानवता धर्म. जगाला प्रेम अर्पावे, हाच आमचा धर्म, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ !

इमेज
संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी  (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे  ऑनलाइन वाचन  आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ ! भारतीय राज्यघटना स्वीकारली गेल्याच्या दिवसाची आठवण  आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.                                           यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमातले सक्रिय सहभागी म्हणून संसदीय कामकाज मंत्रालयाने दोन डिजिटल पोर्टल्स  सुधारित आणि अद्ययावत केले आहेत. खास संविधान दिन, २०२२ साठी केलेल्या या पोर्टल्सपैकी एक राज्यघटनेची उद्देशिका इंग्रजी आणि आणि राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीअंतर्गत नमूद केलेल्या २२ इतर भाषांमध्ये वाचण्यासाठी ( https://readpreamble.nic.in/  ) असून दुसरे  "भारतीय संविधानावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा" ( https://constitutionquiz.nic.in/  ) यासाठी आहे. संविधान दिनाच्या पूर

‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार ! गौरव२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

इमेज
‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव २८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण ! मुंबई, पुणे, नाशिक, दि. २५ नोव्हेंबर :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ.यशवंत मनोहर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.         या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनि

सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत !

इमेज
सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत ! - मंथन प्रकाशनाने कवितेला दिले मानाचे स्थान   पुणे २५ (प्रतिनिधी)::-पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील "आजोळ" या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. या कवितेला मंथन प्रकाशनाने मानाचे स्थान दिले असून सलग दुसऱ्यांदा त्यांच्या कवितेचा समावेश थेट प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे.                     पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांची एकूण पन्नास पुस्तके प्रकाशित आहेत. कळो निसर्ग मानवा या त्यांच्या कवितेचा समावेश इयत्ता सहावीच्या सुगम भारती या पाठ्यपुस्तकात आहे. आता त्यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील "आजोळ" या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांच्याकडे पाचवीचा वर्ग असून विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती सराव चालू आहे. मंथन प्रकाशनाकडून त्यांनी प्रश्नपत्रिकेचे दहा संच मागवले होते. त्यातील तिसऱ्या संचात गुरुजींना व विद्यार्थ्

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा संपन्न !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा संपन्न !     मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बदलत्या तंत्रज्ञानातील अद्यावतपणाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहाय्य विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली.         यावेळी या क्षेत्रातील दिग्गज आस्थापने असलेले केपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले, पायथन आणि एसक्यूएल याबाबतची माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनेक बाबीदेखील समजून घेता आल्या. यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात होतो. संस्थेचे सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संचालक प्रा. अशोक चव्हाण, नियुक्ती अधिकारी स्वप्निल देसा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

इमेज
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय एएमआर परिषदेत सहभागी !     नवी दिल्ली::- ही एक मूक आणि अदृश्य महामारी आहे ज्याकडे इतर सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांद्वारे दुर्लक्ष होऊ  शकत नाही , असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी म्हटले आहे. ओमान मधील मस्कत येथे  सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता (एएमआर) यावरील तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय परिषदेत मंत्रिस्तरीय पूर्ण सत्रात त्या आज बोलत होत्या. १५ हून अधिक देशांतील २२ प्रतिनिधी  या परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चार संस्थांद्वारे एएमआर वर बहु -भागधारक भागीदारी मंचाची सुरुवात करण्यात आली. एएमआर चा प्रसार आणि त्यानंतरच्या जीवघेण्या  परिणामांवर भर देत डॉ. पवार यांनी अधोरेखित केले की एएमआर  हा जागतिक आरोग्याला धोका असून त्याचे  आरोग्य, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या  गंभीर परिणाम होऊ शकतात. एएमआरचा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांवर  लक्ष केंद्रित करत आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

इमेज
आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशी कोणताही संबंध नाही - दातार         नाशिक ( प्रतिनिधी ) - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपादेवी फाट्याजवळ असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. काल ( दि.२३)भ विविध वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले. नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था घारपुरे घाट, अशोकस्तंभ येथे गेली ६८ वर्षे निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन करते. या संस्थेचा संबंधित वृत्ताशी कोणताही संबंध नाही असे संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांनी सांगितले.    आधाराश्रमाचे सचिव सुनीता परांजपे व हेमंत पाठक म्हणाले,  सुप्रसिद्ध वैद्य आण्णाशास्त्री दातार यांनी १९५४ साली या संस्थेची स्थापना केली. अधिकृतपणे बालके दत्तक देणारी आधाराश्रम ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे. सदर बातमीतील नामसाधर्म्यामुळे बऱ्याच हितचिंतक यांचे फोन आल्यामुळे व जनतेचा कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आम्ही हा खुलासा करीत आहोत. यापूर्वी काहीवेळा आधाराश्रम ही आमचीच संलग्न संस्था असल्याचा खोटा प्रचार काही सस्थांनी केला होता, हे देखील  निदर्शनास आले होते असे पाठक यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !

इमेज
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !   दि.१ ते ३० नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. निराधार बालक आणि अपत्यासाठी आसुसलेले पालक या दोन टोकांना दत्तक विधान एकत्र आणते. मात्र या क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन फसवणूक देखील केली जाते. बेकायदेशीर दत्तक प्रकरणे घडतात. नाशिकमध्ये आधाराश्रम ही सेवाभावी संस्था समाजाने नाकारलेल्या निरागस बालकांचे संगोपन करते. त्यांचे शैक्षणिक, मानसिक पालनपोषण करते. आरोग्याची काळजी घेते. अधिकृत दत्तक प्रक्रिया राबवून बालकांना हक्काचे पालक, कुटुंब मिळवून देते. आतापर्यंत सुमारे ९५० पेक्षा जास्त बालके देश-परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.    रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस बालकांनाही इतरांसारखे आपल्याला आईबाबा असावेत, आपले घर असावे असे वाटते. प्रेम करणारी, हक्काची माणसे आजूबाजूला असावीत अशी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच अनाथ बालकांचीही  साहजिक इच्छा असते. दुसरीकडे चारचौघांप्रमाणे आपल्याही संसारवेलीवर बाळाच्या रूपाने  फूल फुलावे, आपला वंश पुढे सुरु राहावा असे अपत्य नसलेल्या जोडप्यांचे स्वप्न असते. या दोन्

कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-

इमेज
कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-        नाशिक मधील राज्य सरकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी ही बँक आधारवड म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी दिनांक २२ सप्टेंबर १९२० रोजी दिंडोरी येथे कै.माधवराव रामचंद्र तथा एम. आर. देशपांडे साहेब यांनी या बँकेची स्थापना केली. सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीसाठी तात्काळ मदत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना बचतीची देखील सवय लागावी या दूरदृष्टी विचाराने व उदात्त हेतूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या बँकेची त्यावेळी स्थापना करण्यात आली.    आज बँकेला १०२ वर्षे पूर्ण होऊन १०३ व्या वर्षात बँकेने पदार्पण केलेलं आहे. या १०२ वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात बँकेने अनेक चढउतार बघितलेले आहे, आणि अनेक संकटाशी देखील सामना करावा लागला आहे, हे जरी खरी असले तरी त्या त्या वेळी कार्यरत प्रामाणिक संचालक आणि पदाधिकारी यांची बँके प्रति असणारी निष्ठा, सन्माननीय सभासदांचा बँकेवर असणारा अतूट विश्वास आणि त्याचबरोबर बँकेची एक निष्ठेने सेवा करीत असणारे माजी व विद्यमान सेवक वर्ग यांचे योगदान निश्चितच मोजण्या

हमारे बाद हाल-ए-गम सुनाने कौन आएगा…?हंसाने तो सब आएंगे मगर हाल-ए-दर्द सुनानेवाला कौन आएगा ? खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…. रणजित राजपूत.

इमेज
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते… आदरणीय…          गेल्या ३२ महिन्यांपासून मी नाशिक चा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आपल्या सोबत होतो. आज मी या पदाची सूत्रे माझ्या ज्युनियर सहकारी श्रीमती अर्चना देशमुख मॅडम यांच्याकडे सोपवून नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू होणार आहे.            ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ मार्च २०२० रोजी मी जिल्हा माहिती अधिकारी, नाशिकची सुत्र स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ २४ तास सोबत राहिलो. माझ्या नाशिकच्या पोस्टींगची २ वर्षे कोरोनासोबत गेली. विशेष म्हणजे कोरोना काळातील सर्व बातम्यांना आम्ही *C* ने क्रमांकाने सुरूवात केली. भविष्यात या बातम्यांच्या C क्रमांकाने आपण कधीही कोरोना काळातील संदर्भ म्हणून उपयोगात आणू शकाल. विशेष म्हणजे या सर्व काळातील वृत्तपत्रीय बातम्यांच्या कात्रणांचे डिजिटल संकलन ही एक मोठी उपलब्धी जिल्हा माहिती कार्यालयात भविष्यात सर्वांसाठी असेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा काळ आश्वासकपणे पार पाडू शकलो. असेच सहकार्य आपण भविष्यात श्रीमती देशमुख मॅडम व माझ्या सहकाऱ्यांना देत रहावे, विनंती.            जिल्हा माहिती