मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार. नाशिक ::-मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी .केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल असे मातंग समाजाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांच्या बाबत शासन सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत बोलतांना डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. राज्यातील हा समाज आर्थिक ,सामजिक दृष्टीने मागासलेला असून तो गावखेड्यात राहतो. त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या लक्षात घेऊन शासन स्तरावरुन सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढण्यात येईल असेही यावेळी डॉ. कदम म्हणाले. तसेच क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योज