पोस्ट्स

शेतीविषयक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग ! रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम !! !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    नाशिक-   ग्रामीण भागातील रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजारच्या माध्यमातून शहरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आज नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित रानभाज्या महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीनच तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. रानभाज्या महोत्सवास १३ महिला स्वयंसहायता समूहांनी आणि ३ शेतकरी उत्पादक गटानी सहभाग नोंदविला .पहिल्याच प्रयत्नात ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून रानभाज्या आणि इतर सेंद्रिय भाज्यांचा हा महोत्सव प्रत्येक

यंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का ? !!! !!!! न्यूज मसाला सर्विसेस ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस यंदा तरी रासाकाचे बाॅयलर पेटणार का ?           नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे  लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या  सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले  निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्

कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी न्यूज मसाला सर्विसेस कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल.    शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा . !!           नासिक::-कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना प्रसंगी मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदा दराच्या घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. कांद्याची अर्धेअर्धास उत्पादन शिल्लक असून ऑक्टोबर महिन्या पर्यंत नवीन कांदा बाजारात  येईल परंतु आज रोजी कांदा दरात प्रचंड घसरण झाली असून यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा आज होणारी निर्यात सुद्धा थांबेल. पर्यायांने पुन्हा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या