काॅग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली !
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या अंतर्गत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकी बाबत चर्चा व सविस्तर माहिती देऊन मतदार याद्याचं सादरीकरण करून ब्लॉक अध्यक्षांकडे देण्यात आल्या. त्यावेळी शरद आहेर यांनी निवडणूक कशा प्रकारे होणार याबाबत सविस्तर विवेचन केले, निवडणुकीत उभं राहण्यासाठी सभासद हा सक्रिय सभासद असला पाहिजे असे सांगितले. शिर्डी येथे १ व २ जून ला शिबीर संपन्न होणार आहे त्यात निवडक पदाधिकारी जाणार आहेत, तसेच ११ जून ते १४ जून या कालावधीत शहर स्तरावरील एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी माजीमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव , गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, केशव अण्णा पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनुजाती विभागाचे प्रदेश सचिव सुरेश मारू, अल्पसं