पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इमेज
विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !                  नाशिक ( प्रतिनिधी) -अफलातून म्युझिक लव्हर्स व संतोष फासाटे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ग्रुपतर्फे सूरसम्राज्ञी लता (भाग २) हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी दि.२९ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता ही विनामूल्य मैफल परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगेल. यावेळी लतादीदींचा सुरेल सुवर्णकाळ अनुभवायला मिळणार आहे.     सुप्रसिद्ध गायिका नमिता राजहंस, अपर्णा देशपांडे, डॉ. विशाखा जपताप, अश्विनी सरदेशमुख, मीनाक्षी भुतडा, सीमा जाधव, स्वाती जाधव, अर्चना सोनवणे लतादीदींनी गायलेली लोकप्रिय गाणी सादर करतील. त्यांना ख्यातनाम सुमधुर गायक हरीशभाई ठक्कर, मयूर तुकडिया, मनोज पळसकर, राजू पवार व उमेश मालवी स्वरसाथ करणार आहेत. त्याचबरोबर संतोष फासाटे यांच्या खुमासदार निवेदनामध्ये लतादीदींचा प्रदीर्घ जीवनप्रवास, त्यांचा संघर्ष, अलौकीक प्रतिभा व अविस्मरणीय आठवणींनाही उजाळा देण्यात येणार आहे. प्रकाश गोसावी पाहुणे गायक तर विशेष सहकार्य सुनील भुतडा य...

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इमेज
"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी ! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)::- ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेला "राजकारण गेलं मिशीत" हा विनोदी चित्रपट नुकताच सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे.             सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटातील  बहुतांश कलाकार मराठवाड्यातील असून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि गीतकार उद्धव भयवाळ यांच्या 'लावण्य बहार' या अल्बम मधील एक लावणी या चित्रपटात घेण्यात आलेली आहे.              या लावणीच्या निमित्ताने उद्धव भयवाळ यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून समाजातील सर्व स्तरांमधून भयवाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. २० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल मधील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला. यावेळी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, संगीतकार अतुल दिवे, गीतकार उद्धव भयवाळ तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

इमेज
इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !  नाशिक ( प्रतिनिधी ) इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडीशनींग इंजिनिअर्स (इशरे) या संस्थेच्या नाशिक शाखेचा नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ  शनिवारी (दि. २०) एप्रिल रोजी हाॅटेल ग्रॅन्ड रिओ येथे करण्यात आला. शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप बालानी, उपाध्यक्ष मिहीर संघवी, पश्चिम विभागीय व्यवस्थापक  मनीष गुलालकरी उपस्थित होते.     नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी, उपाध्यक्ष वरुण तिवारी, सचिव अनिकेत चौधरी, खजिनदार अनिता बोराडे व कार्यकारिणी सदस्य  गुलाम हुसेन, प्रविण कामाले, प्रविण पातुरकर, सारंग दिडमिशे, रोहिणी मराठे, शामसुंदर कापसे यांनी शपथ घेतली. संस्थेचे मावळते अध्यक्ष गोविंद नायर यांनी  २०२३ - २४ या वर्षातील संस्थेच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व विविध उपक्रमातील सहकार्याबद्दल मावळत्या संचालक मंडळाचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी यांनी आगामी संकल्पित कार्यक्रमांची रूपरेषा विषद केली.     ...

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

इमेज
निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते ! लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घ्यावी लागते शपथ नाशिक::- लोकसभा, राज्यसभा,  विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भारताच्या संविधानावर माझा खरा विश्वास आणि निष्ठा असेल आणि आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेल अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ आयोगाने निर्देशित केलेल्या व्यक्तींपुढेच घ्यावी लागते, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सर्वसाधारणपणे निवडणूक होणा-या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घेता येते. तसेच आयोगाचे निर्देशानुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे देखील उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक लढविणारा उमेदवार जर प्रतिबंधात्म...