पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी इशादीन शेळकंदे यांची नियुक्ती , सहाय्यक आयुक्त पदी प्रतिभा संगमनेरे यांची बदली !

इमेज
प्रतिभा संगमनेरे यांची सहाय्यक आयुक्त पदी बदली ! नासिक::- जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता ) यापदी असलेल्या श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांची सहाय्यक आयुक्त, ( विकास ) विभागीय आयुक्त कार्यालय नासिक विभाग, नासिक येथे बदली झाली असुन त्यांच्या बदलीने रिक्त जागी राहुरी (अहमदनगर) येथील गट विकास अधिकारी इशादिन डी.शेळकंदे हे बदलीने येत आहेत, विभागीय सहाय्यक आयुक्त (विकास) श्रीमती प्रतिभा संगमनेरे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद नासिक पदी येत असलेले इशादीन डी.शेळकंदे यांच्या पुढील कारकीर्दीस न्यूज मसाला कडून शुभेच्छा !

क्रुषी विभाग-----पदाचा दुरूपयोग करून लाभ मिळविल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाकडून विभागीय क्रुषी अधिकारी, तालुका क्रुषी अधिकाऱ्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर जा !!

इमेज
सन 2015-2016 मध्ये मौजे जळगाव ता. बारामती येथील ग्रामस्थांसाठी खासदार निधीतून मंजूर  सिमेंट नाला बांधकामातील निविदा प्रक्रिया पूर्ण करताना आरोपी नामे (१) गोविंद पर्वतराव परजणे तत्कालीन विभागीय क्रुषी अधिकारी, (२)संतोषकुमार नारायण बरगडे तालुका क्रुषी अधिकारी,(३) पोपट शंकर ठोंबरे मंडळ क्रुषी अधिकारी,(४) शाहूराज हरिश्चंद्र मोरे क्रुषी पर्यवेक्षक,(५) विजय किसन चांदगुडे क्रुषी सहाय्यक यांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्टर ने मुदतीत कामे पूर्ण केली नाही. म्हणून नव्याने सिद्धांत कन्स्ट्रक्शन यांनी निविदा भरलेली नसताना त्यांचा फायदा होण्याच्या हेतूने त्यांच्या नावाने कामाचे कार्यरंभाचे आदेश अधिकारात नसताना बेकायदेशीरपणे काढले. तसेच सिद्धांत कन्स्ट्रक्शन कडून अनामत रक्कमा व अतिरिक्त सुरक्षा ठेव भरून घेतल्या नाहीत. अशा प्रकारे आरोपी क्रमांक 1 ते 5 यांनी आपल्या नियंत्रणात असलेल्या शासकीय रक्कमेचा वापर सिद्धांत कन्स्ट्रक्शन याना करून देण्यास मुभा दिली व त्यांचा आर्थिक लाभ व्हावा या हेतूने पदाचा दुरुपयोग केला व सिद्धांत कन्स्ट्रक्शनचे   प्रोपरायटर शिवाजी एकनाथ भोंडवे

घरकुल योजनेसंदर्भात ग्रामपंचायतींची सुनावणी घेणार! अपूर्ण घरकुले तसेच दुसरा व तिसरा हप्ता वितरण बाबत ३१ मे रोजी सुनावणी !!

इमेज
नाशिक - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कमी प्रगती असणाऱ्या तालुक्यांची सुनावणी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी घेतला आहे. 31 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. घरकुल योजनेत ज्या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काम सर्वात कमी आहे, घरकुले मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत तसेच दुसरा व तिसरा हप्ता अद्याप वितरित केलेला नाही अशा ग्रामपंचायतीची सुनावणी केली जाणार आहे.या सुनावणीत संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, उप अभियंता,शाखा अभियंता,स्थापत्य अभियंता,ग्रामीण गृह निर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरकुले वेळेत का पूर्ण झाले नाही, कामे प्रलंबित राहण्याची कारणे आदींबाबत यावेळी संबंधितांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.

भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे येवला उपजिल्हा रूग्णालयासाठी ७० व खडकमाळेगांव प्रा.आरोग्यकेंद्रासाठी १५ पदांना शासनाची मंजुरी.

इमेज
           नाशिक,येवला,दि.२४ मे:- नाशिक येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील कर्करोग व किडनी प्रत्यारोपन विभागासह येवला येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झालेल्या रुग्णालय तसेच निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील आकृतीबंधासह  येवला ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी छगन भुजबळ हे सातत्याने पाठपुरावा करत होते.           येवला रुग्णालयाचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या ८ कोटी ५० लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून दि.१४ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हे बांधकाम सुरु व्हावे यासाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरूच होता. या इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून आता येथील पदांचा आकृतीबंध सुद्धा मंजूर झाल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याच्या दृ

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती, अधिकाऱ्यांचे आढावा बैठक संदर्भात प्रशिक्षण, पाणी शुद्धिकरण प्रकल्पाची पाहणी,

इमेज
नाशिक  – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी आज कळवण तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे डॉ गिते यांनी प्रत्येकाचा वैयक्तिक व दिवसभर उभा राहून आढावा घेतला. बदली होऊनही अद्यात दप्तर न देणाऱ्या दोन तात्कालिक ग्रामसेवकांवर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. विविध विकासकामांचे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून देत त्यानंतर माझ्या दालनात सविस्तर आढावा घेणार असल्याचा इशाराही दिला. एकूणच डॉ गिते यांच्या कडक आढाव्यामुळे ग्रामीण भागातील अपूर्ण असलेल्या  विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. कालवण तालुक्याची आढावा बैठक आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत येथील हरी ओम लान्स मध्ये घेण्यात आली.  महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती देताना ग्रामसेवकांनी ग्राम विकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देशही दिले. सुरवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनांच्या गावांच्या समावेशासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत !

इमेज
नाशिक – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यातील नवीन पाणी पुरवठा योजनांच्या गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनांनुसार सदरची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने प्राप्त स्थळ पाहणी अहवालानुसार गावातील पिण्याच्या पाण्याची सध्यस्थिती, नवीन योजनेची आवश्यकता व व्यवहार्यता याबाबत सविस्तर आढावा घेऊन नवीन योजनेची आवश्यकता असलेल्या गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्याबाबत शिफारस करावयाची आहे. समितीने शिफारस केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनांच्या गावांची यादी स्थळ पाहणी अहवालानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचे मार्फत संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांचेकडे सादर करावयाची आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हे सदस्य सचिव असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व भूजल सनियंत्रण व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक हे सदस्य आहेत.

पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांनाच शहराला पुढील तीन दिवसांत नवीन पोलीस आयुक्त देणार-मुख्यमंत्री

इमेज
औरंगाबादला ७२ तासांत मिळणार नवे पोलीस आयुक्त:मुख्यमंत्री. औरंगाबादच्या दंगलीनंतर पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असतानाच आता शहराला पुढच्या तीन दिवसात नवा पोलीस आयुक्त  देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरा भेट घेतली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. औरंगाबाद दंगलीप्रकरणी संबंधितांवर कठोरकारवाईची मागणी सर्वपक्षीयांनी या बैठकीत केली. त्यावर आयपीएस अधिकाऱ्यांची एक उच्च स्तरिय चौकशी समिती नेण्याचंही मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय.दरम्यान, दंगलग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणीही यावेळी मान्य करण्यात आली.  दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून निरपराध लोकांची सुटका करण्यात येईल असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्त्रोत,सौजन्याने-

अरेरे,, कसले कसले अनुदान खाणार, शेतकऱ्यांचा संताप ! जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !!

इमेज
पालम तालुक्यातील उमरा येथील तलाठ्याने गावातील पुढाऱ्यासोबत संगनमत करत लाखो रुपयांचे गारपीटीचे अनुदान एकाच कुटुंबातील १० सदस्यांच्या नावे टाकून दिले. तसेच उमरा या गावच्या शिवारात एक गुंठाही जमीन नसताना त्याचेही नाव बागायतादार शेतकऱ्यांच्या यादीत टाकून पात्र शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणी उमरा येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून गावच्या पुढाऱ्यांसह दोषी असलेल्या तलाठ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तलाठ्याच्या या महाप्रतापामुळे पालम तालुक्यातील शेतकरी वर्गात उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. उमरा येथील आनंत मनोहर उगले, पंकज ज्ञानेश्वर चव्हाण, किशन सखाराम काचूळे, अनुरथ लिंबाजी चव्हाण, ज्ञानेश्वर विश्वनाथ शिंदे, बालाजी तुकाराम काचूळे, जब्बार अकबर पठाण, सुदाम बालासाहेब उगले, नारायण हारजी उगले, चंद्रकांत मंचक पौळ, केशव सुभाष उगले, पांडुरंग लिंबाजी उगले, पंडित मुंजाजी उगले,माधव रतन गिरी, उत्तम किशनराव गादगे, लोकश विठ्ठल उगले आदी शेतकऱ्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली लेखी तक्रार मांडली. यात म्

कार्यालयीन वेळेत संगणकावर दूरचित्रवाणी पहाणे व पत्त्यांचा खेळ खेळणे पडले महागात ! कर्मचारी निलंबित !

इमेज
नाशिक – शासकीय कार्यालयात संगणकावर दूरचित्रवाणी वाहिनी बघणे आणि पत्यांचा खेळ खेळणे जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ सहायकास चांगलेच महाग पडले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सदर कर्मचारी याकामात इतका गुंग झाला होता की मुख्य कार्यकारी आपल्यापाठीमागे गुपचूप येऊन २० मिनिट बसून हा सर्व प्रकार बघत असल्याचे भानही त्यास राहिले नाही. शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शरणपूररोड येथील कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयातील वरिष्ठ सहायक आर.के.गांगुर्डे हे कायालयीन कामकाजा ऐवजी संगणकावर दूरचित्रवाणी लावून बातम्या बघत असल्याचे व पत्यांचा खेळ खेळत असल्याचे निदर्शनास आले. संगणकात व्यस्त असलेल्या गांगुर्डे यांना डॉ गिते कार्यालयात आल्याचे व आपल्या मागे बसून असल्याचे लक्षातही आले नाही. याबाबत डॉ गिते यांनी त्वरित सदर कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ (१) (अ) अन्वये वरिष्ठ सहायक गांगुर्