पोस्ट्स

#काठमांडू #भारत-नेपाल #news masala लेबलसह पोस्ट दाखवत आहे

काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत-नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम

इमेज
काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम जागतिक मातृभाषा दिनानिमित्त नेपाळ येथे आयोजित बहुभाषिक विश्व साहित्य संमेलनातून !     काठमांडू (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनाच्या सहअध्यक्ष म्हणून नांदेडच्या साहित्यिक डॉ.ज्योती कदम या  आमंत्रित होत्या. बहुभाषिय संमेलनामुळे नेपाळ- भारत मैत्रीचे धागे अधिक घट्ट होतील असा विश्वास डॉ.ज्योती कदम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.  डॉ.ज्योती कदम  यांच्या "आदिम जाणीव" या कवितेने उपस्थित रसिक - श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत रसिकांची दाद मिळवली.       भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि . सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले . त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली,