पोस्ट्स

संवेदनशीलता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार- अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज झालेल्या शिबिरात रक्तदान करून महीला वर्गापुढे एक आदर्श निर्माण केला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबवली जाणार मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही केले रक्तदान नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर या काळात टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबीर घेण्याचा मनोदय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात दिनांक १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद, नाशिक व जिल्हा शासकीय रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसो

सामाजिक दातृत्वाची अनुभूती,. निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट नासिक ::-  'निमा' नाशिक च्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट त्याच बरोबर थर्मामीटर गन, पल्स ऑक्सिमीटर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागास प्रदान करण्यात आले. या मेडिकल किट मध्ये दोन गॉगल, २ एन९५ मास्क, २५ डिस्पोझेबल मास्क, १००मिली. सॅनिटायझर बॉटल, २५० मिली. सॅनिटायझर बॉटल अशा स्वरूपाच्या वस्तू आहे, या वस्तू ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले, निमाच्या या सामाजिक दायित्वाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी उपस्थित निमाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कलकर्णी, बाळासाहेब गुंजाळ, निमा हेल्थ कमिटीचे चेअरमन जयंत पवार, कैलास वराडे, लिगल कमिटीचे चेअरमन संजय महाजन, निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे आदी उपस्

रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801,.

इमेज
रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! नाशिक - कोरोना योद्ध्यांनी केलेल्या बहुमूल्य अनमोल कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रमच आहे. परंतु त्या बरोबरच या योध्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्हीएलटीएमच्या  किटचे वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट तर्फे होत आहे. नाशिक व नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकांना परिषदा व महानगरपालिकांना व्हीएलटीएम या किट्सचे वितरण करून एका भव्य व उदात्त हेतूसाठी रोटरी क्लब कार्यरत आहे. सामान्यत: नाकातील आणि घशातील नमुने साठविण्यासाठी (व्हीएलटीएमच्या) व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम किटस काचेच्या सिलेंडरचा वापर होतो. तदनंतर हे कोविडचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.  परंतु हे करत असतांना असे निदर्शनास आले कि, या कोरोना पद्धतीने काम करत असतांना कोरोना योध्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.  कोरोना योध्यांची जोखीम कमी करण्याचा भाग म्हणुन ही महत्वपूर्ण व आवश्यक बाब लक्षात घेऊन व्हीएलटीएमच्या किट्स हे अत्यंत प्रभावी व  सुरक्षित आहे. कारण या किटस वापरले गेलेल्या घटका

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..... शब्द देऊन शब्दला कृतीत आणण्यासाठी झटणारे विरळाच असतात ! कोणी शब्द कृतीत आणला या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले,, रासाका माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांनी पूर्णाकृती पुतळ्याला उजेडात आणून आपला शब्द ठरविला खरा . निफाड तालुक्यातील रासाका  कार्यस्थळावरील कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा   रासाकाचा  वीज पुरवठा खंडित असल्या कारणाने अनेक वर्षापासून अंधारात होता तर ज्यांनी हा पूर्णाकृती पुतळा रासाका  कार्यस्थळावर उभारला ते रासाका चे  माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांना कर्मवीरांचा पुतळा अंधारात ही बाब खटकत होती कारण ज्या कर्मवीर काकासाहेब काकासाहेब वाघ यांनी रासाका  नाही तर तालुक्यातल्या उत्तर-पूर्व पट्ट्यात सर्वप्रथम वीजपुरवठा आणला त्यांचाच   पुतळा अंधारात असल्याने कर्मवीर प्रेमींना वाईट वाटत होते त्यामुळेच     दत्तात्रय पाटील डुकरे यांनी स्वखर्चातून जवळपास 25 हजाराचा  सौर ऊर्जा किट कर्मवीर काकासाहेब वाघ पुण्यतिथीच्या दिवशी घोषणा करत देण्याचे रासाका  कार्य स्थळावरील कर्मवीराना  22 जुलै या कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने अभिवादन करताना सांगितले व त्याची अंमलबजावणी करत कर्मवीरांचा पुत

आजीबाईंच्या निधनानंतर नातू हार्दिक निगळ याने कशाप्रकारे वाहीली श्रद्धांजली !! , , सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! ,

इमेज
प्रकाश उखाडे यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कष्टप्रद ‘आजीबाईं’ च्या निधनानंतर आपल्या शेतातच अस्थिविसर्जन व वृक्षरोपणाने जपल्यात आठवणी..!’         नासिक::- काळी आई धन धान्य देई.. म्हणूनच आपल्या मायभुमीवर प्रेम अन् सतत कष्ट करता-करता मायभुमीमुळेच आपले जीवन सफल झाले..आज सारंच कुटूंब गुण्यागोविंदाने जीवन जगत आहे..ते केवळ आपल्या आजीबाईंमुळेच..म्हणून आजीबाईंच्या निधनानंतर आठवण कायम रहावी यासाठी म्हसरूळच्या निगळ कुटूंबाकडून अस्थिविसर्जन कुठल्याही तीर्थक्षेत्री न करता आपल्याच शेतात खड्डे खोदून अस्थि विसर्जनासह विविध प्रकारचे वृक्षारोपण करून आजीबाईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.             आजीबाईंनी आपले संपुर्ण जीवनच शेतात घालवलं..अन् शेतातच राबतां-राबतां आपल छोटंस कुटूंब बहरलं..अशा या आजच्या छोट्यातून मोठया सदस्यात बहरलेल्या आनंदमय कुटूंबातील कष्टमय माऊलीच देवाघरी निघून गेली..त्यानंतर मात्र त्याच माऊलीच्या आठवणी शेतातच रहाव्यात यासाठी आजी माऊलीचा नातू हार्दिक निगळ याच्या संकल्पनेतून व सर्वांच्या एक विचाराने अखेर सदर वयोवृध्द आजीबाईंचे निधनानंतर अस्थिविसर्जन हे  त्यांच्याच शेतात करण

मे. तहसीलदार चर्चेचा विषय ठरले ! मग चर्चा तर होणारच !! काय केले मे. तहसीलदारांनी, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,        नासिक::- निफाड तालुक्याचे तहसीलदार म्हणून असलेले दीपक पाटील हे आज चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्याला मिळालेल्या शासकीय वाहनाने  लासलगाव-विंचूर रस्त्याने जात असताना त्यांचा कडून झालेल्या कार्यामुळे चर्चा होत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या कामकाजातून अनेक घटनांतून संवेदनशील अधिकारी असल्याचे  दाखवून दिले आहे.      काल दि. २७ जुलै रात्री विंचूर रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे दीपक पाटलांची माणुसकी व संवेदनशीलतेचा जनतेला प्रत्यय आला, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा भरात नव्हे तर महाराष्ट्रात वाढत चाललेला असतांना संकटसमयी ही मदतीला धावणारे विरळाच, गाडीला लिफ्ट मागितली तर ती मिळत नाही, अनोळखी व्यक्तिला गाडीवर बसवून घ्यायला तयार नाही, जो तो सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करत कोरोनाच्या  प्रादुर्भावापासून अलग करीत आहेत, अशा वेळी  दोन तरूण अपघात होऊन रस्त्यावर पडलेले असताना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सरकारी गाडीत त्यांना उचलून टाकत त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले,  या दोघा तरुणांना कोरोणाच्या काळात एक प्रकारे जीवनदा