"असे ही एकदा व्हावे" असं वाटत असेल तर ६ एप्रिलला बघायलाच हवा !
नरेंद्र पाटील, संपादक-न्यूज मसाला,नासिक +91 07387333801 पुणे(२६)::- "असे ही एकदा व्हावे" या आशेवर प्रत्येक व्यक्ती जीवन व्यथित करीत असतांना तो अनेक नात्यांना जपत त्यांची जबाबदारी पेलत, गुंतागुंतीच्या आयुष्यात रंग भरित असतो. अशा या नात्याच्या याच आशावादी पैलुंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंट निर्मित आणी सुश्रुत भागवत दिग्दर्शित "असे ही व्हावे" हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यांत आला आहे. अवधूत गुप्तेंच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाची गाणी तयार झालीत. रोमँटीक गाणं, एक गझल व एक शास्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. या गाण्यांमधील "किती बोलतो आपण" या गाण्याला किर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तसेच "भेटते ती अशी" या गाण्यासोबत "यु नो व्हाट" या कवितेने रसिकांना प्रदर्शनापूर्वीच मोहीनी घातली आहे. ही कविता उमेश कामत व तेजश्री प्रधान ने म्हटली आहे. तीला वैभव जोशी ने शब्दबद्ध करतांना या कवितेचे गाण्यांत रूपांतर न करता दोन्ही कलाकारांकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने साधली.