निसर्गाचं गाणं, लोकसंस्कृतीचं लेणं ! निसर्ग व लोकसंस्कृतीप्रेमींसाठी खास लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
निसर्गाचं गाणं ; लोकसंस्कृतीचं लेणं ! दुर्गम भागात वस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक जमाती भारतात आहेत. त्यांना मूलवासी किंवा आदिवासी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, नंदुरबार, तसेच विदर्भातील काही भाग आदिवासी बहुल आहे. शेजारच्या डांग भागातही आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यात प्रामुख्याने वारली, कोकणा, कातकरी, गोंड, कोरकू, भिल्ल या जमातींचा समावेश होतो. त्यांच्या जीवनशैलीवर जसा निसर्गाचा प्रभाव आहे, तसाच तो त्यांची लोकगीते, लोककथांवरही आहे. सूर्यचंद्र, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडंझुडपं, सभोवतालचा परिसर यांचं वर्णन आणि गुणगान त्यात आढळतं. ते त्यांच्या लोकसंस्कृतीचंच कलारूप आविष्करण आहे. वारली चित्रशैलीत तर ते अधिक नितळपणे प्रतिबिंबित होतं. सध्या वसंत ऋतूत जणू सारी सृष्टीचं गाणं गात असते. ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या वारली चित्रशैलीला बऱ्याचदा लोककथांंचा आधार असतो. लोकगीतांमधील लय, ताल व विचार चित्रांमध्ये प्रकट होतो. लोकसंस्कृतीची रसरशीत भावानुभूती त्यातून मिळते.आदिवासी वारली जमातीतील कलाकार, विशेषतः स्त्रिया आपल्या झोपडीच्या भिंती चित्रांनी सजवतात.