निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा ! सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !!
निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा ! सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !! नाशिक ( प्रतिनिधी ) निर्मिती पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून राजलक्ष्मी बँकेचे संचालक जगन (अण्णा) पाटील व नाशिकमधील प्रख्यात वास्तुविशारद अरुण काबरे उपस्थित होते. यावेळी गतवर्षीच्या तुलनेत ४४ लाखांची वाढ होऊन १ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे सांगण्यात आले. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. निर्मिती पतसंस्था ही बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगले काम करत असल्याचे जगन(अण्णा) पाटील यांनी नमुद केले. संस्थेच्या संचालकांनी योग्य नियोजनामुळे संस्थेचा कारभार प्रगतीपथावर नेला आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात संस्थेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेचे कामकाज हे कौतुकास्पद असल्याचे नमुद केले. आर्कि.अरुण काबरे यांनी मनोगतात संस्थेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगितले व निर्मिती पतसंस्थेने जीवनगौरव केल्याबद्दल आभार मानले. ३१ मार्च अखेर निर्मिती पतसंस्थेस १ कोटी