पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भुजबळ म्हटलं की राजकीय, सामाजिक, व प्रशासनात 'जान' कशी आणी कुठून येते ? संजय राऊत दोन जानेवारीला कसा 'च' लावणार !! होऊ घातलेल्या दिमाखदार वास्तुच्या भूमीपूजनाचा एक राजकीय 'डाव' खालील लिंकवर क्लिक करून वाचा !!!

इमेज
" जिल्हा परिषद नवीन वास्तू भुमीपूजन स्थळावरून न्यूज मसाला !" "लोहा गरम है, मारो हातोडा"      नासिक::- येत्या ३० तारखेला खोळंबलेला मंत्रीमंडळ विस्तार होत आहे तत्पूर्वी प्रस्तावित जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पार पाडण्यात आले. ग्रामविकास खात्याचा पदभार ना. छगन भुजबळांकडे आहे व तो कायम राहील की नाही हे लवकरच कळेल. त्या आधी भुजबळांनी अशी आलेली संधी सोडली ! असं शक्य नाही हे सर्वश्रुत आहे, अवघ्या दोन दिवसांत सारी राजकीय, प्रशासकीय यंत्रणा कामाला जुंपून भुमीपूजनाचा बार उडवून आपल्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. भुजबळ म्हटलं की राजकीय, सामाजिक, प्रशासनात नवी "जान" कशी आणी कुठून येते हे स्व:ता भुजबळंनाही शोधून सापडणार नाही पण परिस्थिती तशी आपसूकच निर्माण होते. "अशा वेळी जर "लोहा गरम है तो हातोडा मारणें मे " कोण उशीर करेल"       या गडबडीत प्रशासनाने मोठमोठे फलक लावले, फलकावर काय लिहिले हे तपासायला ही वेळ मिळू नये ईतक्या घाईघाईने कार्यक्रम उरकला हा त्याचाच पुरावा समजावा काय हे त्याचे उदाहरण !      फलकावरी

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप... मा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ...         नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय  ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्य

समाजातील दिव्यांगांच्या उत्कर्षासाठीच्या शिवाश्रम चे २५ डिसेंबर ला लोकार्पण ! राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्वप्नातील आश्रमाची डॉ. विजय तनपुरे करीत आहेत स्वप्नपूर्ती !! अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
२५ डिसेंबरला शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा. विविध क्षेत्रातील मान्यवर लावणार उपस्थिती.          नासिक::- महाराष्ट्राचे वैभव, अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी नगरीचे भुमिपुत्र असलेले, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्वशिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात निर्माण करण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा येत्या २५ डिसेंबरला संपन्न होणार आहे. शिवाश्रमासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबीयांनी ५० गुंठे जमीन विनामूल्य दान करून अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या जागेवर ४२०० चौरस फूट आकाराची भव्यदिव्य शिवाश्रम इमारतीची उभारणी झाली आहे. शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी त्यांच्या पोवाड्याच्या त्याचबरोबर किर्तन व्याख्यान आदी कार्यक्रमातून जमा झालेले मानधन शिवाश्रमासाठी तसेच आईने शिवाश्रमासाठी जमा करून ठेवलेले एक लाख रुपये तसेच महाराष्ट्रातील विविध दानशूरांनी यथाशक्ती वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत केली. या सर्वांच्या सहका

पी.एम.एस प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश ! प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या लेखी सूचना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक – नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सर्व बांधकाम विषयक विकास योजनांसाठी पी. एम. एस. प्रणालीच्या माध्यमातून कार्यवाही करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक केले आहे. सदर प्रणालीची अंमलबजावणी तसेच ई-निविदा विषयक तक्रारीचे निराकरण करणे सुलभ तसेच जलदगतीने व्हावे याकरिता सर्व नोंदणीकृत ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्था या प्रवर्गातील ठेकेदारांच्या साठी गुगल फॉर्मवर आधारित तक्रार प्रणाली सुरू करण्यात आली असून या प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी केले आहे.         सदर तक्रार प्रणाली नोंदणीकृत ठेकेदारानं करिता असून सदर तक्रारीत कामाचे नाव ठेकेदाराचे नाव ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंदविणे तसेच  पी. एम. एस. (प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम) अथवा ई-निविदा विषयक कामाच्या बाबतीत पीएमएस क्रमांक अथवा इ निविदा क्रमांक टेंडर आयडी नोंदविणे आवश्यक राहणार आहे.         सदर तक्रार प्रणाली ऑनलाइन असल्याने ज्या विभागांशी संबंधित सदर तक्रार असेल त्यांनाही तक्रार ई-मेल द्वारे प्राप्त झाल्यानंतर सदर तक्रारीचे निवारण करून त्याबाबत केलेल्या

निलंबित ३९ ग्रामसेवकांपैकी १८ ग्रामसेवकांना पुर्न:स्थापित करण्याचे आदेश ! ग्रामविकासावर परिणाम होऊ नये म्हणून घेतला निर्णय-मुख्य कार्यकारी अधिकारी !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक  – जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत विविध ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणा-या व विविध कारणांमुळे ३ महिन्यांपासून अधिक निलंबित करण्यात आलेल्या १८ ग्रामसेवकांना विभागीय चौकशीस अधिन राहून आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी पुर्न;स्थापित केले असून याबाबतचे आदेश संबंधित पंचायत समितींना देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. जिल्हयात १३८४ ग्रामपंचायती असून त्यात ग्रामसेवकांची १०१९ पदे मंजुर आहे. त्यापैकी सदयस्थितीत ९१६ पदे कार्यरत आहेत. कार्यरत ९१६ पैकी विविध कारणांमुळे ३९ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते. ग्रामसेवकांना तसेच वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असून मात्र कर्मचा-यांवर नियंत्रण रहावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचे अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी यांचेकडून विविध कारणांमुळे ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.. ग्रामसेवकाला निलंबित केल्यानंतर त्या

इंदोरस्थित सुर्योदय परीवाराकडून दत्तजयंती उत्सव साजरा ! राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांच्या अपूर्ण राहिलेल्या सामाजिक कार्य अखंडपणे सुरू राहणार- डॉ. आयुषी देशमुख. सामाजिक कार्यात अग्रेसर सुर्योदय परीवारावर टिका करणाऱ्यांना छावा शैलीत उत्तर दिले जाईल - करन गायकर. न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील यांच्या कार्याचा सुर्योदय परीवाराकडून यथोचित गौरव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
इंदोर येथे दत्त जयंती उत्सव साजरा-  सूर्योदय परिवार. श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर द्वारा आयोजित श्री दत्तजयंती महोत्सव २०१९ दि.११ डिसेंबर २०१९ रोजी ,सद्गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या अशिर्वादाने, प्रेरणेने ,वास्तव्याने पुनीत झालेल्या सूर्योदय आश्रम ,भारत माता मंदिर ,बापट चौराहा, सुखलिया इंदोर येथे मोठ्या उत्साहात डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख (धर्मपत्नी परमपूज्य श्री भय्यूजी महाराज) यांच्या मार्गदर्शन व समर्थ नेतृत्वाखाली संपन्न....                    इंदोर (११)::-दत्त जयंतीला दत्त तत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. यामुळे परम पूज्य भय्यूजी महाराज यांच्या नंतर देखील सूर्योदय परिवाराच्यावतीने अविरतपणे सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील वारसा जपण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवण्यात आलेले आहे. दत्तजयंती उत्सवानिमित्त ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ सकाळी ९ ते १२ श्री गुरुचरित्र पारायण संपन्न झाले व सांगतादिनी ११ डिसें. रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा सुरूवात

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
                                                                  राज्य शासनाने  सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा . छावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन !        नासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू  महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही  संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची "सारथी" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश

तीनशे स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदानातून राबविली स्वच्छता मोहीम ! मोहीमेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारींसह अनेकांचा सहभाग !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज  किल्ले रामशेज (ता. दिंडोरी)  येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या श्रमदानातुन रामशेज गावात तसेच किल्याच्या माथ्यावरील विविध प्रकारचे प्लास्टिक जमा करण्यात आले. या मोहिमेत तीनशेहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्राम दत्तक योजना राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी  चंद्रकांत भावसार, सरपंच जिजाबाई कांजळे, उपसरपंच संजय बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभिनयाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी किल्याच्या पायथ्यापर्यंत स्वतः श्रमदान करून प्लास्टिक संकलित केले. किल्यावरील मंदिर तसेच परिसराचीही यावेळी स्वच्छता करण्यात आ

पी एम एस प्रणाली विकसित देशांमध्ये वापरली जाते ती भारतासारख्या विकसनशील देशांत प्रभावीपणे लागू झाल्यास जगाच्या पाठीवर भारत लवकरच विकसित देश म्हणून ओळखला जाईल ! पी एम एस प्रणालीला विरोध का ? प्रशासन ठेकेदारांना समजावून सांगण्यात अपयशी ठरते आहे काय ? दोन्ही बाजू काय आहेत व पी एम एस प्रणालीची अंमलबजावणी याबाबतच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
नाशिक (प्रतिनीधी)::- ठेकेदारांना पीएमएस प्रणाली लागू करण्याबाबत जिल्हा परिषदेतील प्रशिक्षण वर्गात ठेकेदारांनी जि. प. प्रशासनातील कर्मचाऱ्या कडून होणाऱ्या अडवणुकीचा पाढाच वाचला.  व आमच्या अडचणी सोडवा अशी भूमिका घेत प्रणालीलाच विरोध केला .अखेर मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रभारी  जिल्हाधिकारी  यांनी व्यावसायिकांच्या समस्या ऐकून त्यावर योग्यतो मार्ग करण्याचे आश्वासन देत पी.एम.एस. प्रक्रियेत ठेकेदारास स्वतःचीच मोजमापे लिहिता येणे शक्य झाले असून विभागामार्फत लगेचच खातरजमा झाल्या नंतर बिल मिळणे प्रक्रियेत बचत व पारदर्शकता कशी निर्माण होणार या बाबद मार्गदर्शन केले . बुधवारी  कै. रावसाहेब थोरात सभागृहाच्या नव्या बिल्डिंगमध्ये पी एम एस प्रणाली ठेकेदार नोंदणी प्रक्रिया लागू करण्याबाबद मार्गदर्शन आणी प्रशिक्षण देण्यासाठी ठेकेदार, मजूर संस्था, सुरक्षित बेरोजगार अभियंता यांच्या साठी अभ्यास वर्गाचे आयोजन केले होते. यास प्रारंभी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी मार्गदर्शन  करताना या नोंदणी प्रक्रियेमुळे फायलीचा विलंबाने होणारा प्रवास व त्रास बंद होईल हे नमूद केले. यावेळी उपस्थि

आज नाम. बाळासाहेब थोरात नासिक दौ-यावर ! माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट !! दौऱ्याच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आज शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी वाजता प्रदेशाध्यक्ष, नामदार बाळासाहेब थोरात नाशिक दौ-यावर !     नासिक::-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे आज शुक्रवार दि.६ डिंसेबर रोजी सकाळी ९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे हेलिकॅाप्टर व्दारे आगमन होत आहे. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- स.९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे आगमन स.९.५० वाजता गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह,  स.१०.३० वाजता कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट व नंतर सकाळी ११.०० वाजता पोलिस परेड ग्राउंड येथुन हेलिकॅप्टरने धुळे जिल्ह्याकडे प्रयान.

लाच स्विकारताना दोघांना अटक ! कुणी, कशासाठी मागीतली लाच ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आलोसे नानासाहेब रामकिशन नागदरे,पोलीस निरीक्षक, व  सुभाष हरी देवरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, दोन्ही नेमणुक नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांना २२,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक करण्यात आली.               तक्रारदार यांचे ७ डिसेंबर २०१९ रोजी सुला वाईन, नाशिक म्युजिक इवेंट असून त्यासाठी त्यांना साउंड सिस्टीमची परवानगी देणेकामी तक्रारदार यांचेकडे दि.४/१२/२०११ रोजी आलोसे  नानासाहेब रामकिशन नागदरे, पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २२,०००/- रुपये लाचेची मागणी केली व त्यानंतर दि ५/१२/२०१९ रोजी आलोसे सुभाष हरी देवरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी याच कामासाठी तक्रारदार यांचेकडे ९.०००/-रूपये लाचेची मागणी केल्याने, ला.प्र वि नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता पंचसाक्षीदार यांचे समक्ष आलोसे नानासाहेब  नागदरे, यांनी २२,०००/-रुपये लाचेची रक्कम आज दि.५/१२/२०१५ रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कक्षात स्विकारली असता नानासाहेब नागदरे, व स

बॅंकेच्या कर्ज मर्यादेत ८ लाखावरून १० लाख करण्याचा संचालक मंडळाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय !!! नुतन अध्यक्ष सुनील बच्छाव व उपाध्यक्ष अजित आव्हाड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या कर्ज मर्यादेत वाढ - सुनिल बच्छाव, अध्यक्ष       नासिक::- नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या नियमित कर्जाची मर्यादा दि.०१ डिसेंबर २०१९ पासुन ८ लाखावरून १० लाख इतकी करण्याचा महत्वपुर्ण कर्मचाऱ्यांना दिलासा देणार निर्णय घेण्यात आला.           नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे नुतन अध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी सांगितले आहे तसेच सभासद झाल्याबरोबर १ वर्षापर्यंत देत असलेला कर्ज मर्यादेत देखील वाढ करून ३ ऐवजी ५ लाख इतकी तर २ वर्ष पुर्ण झालेल्यांना ४ ऐवजी ७ लाख इतकी मर्यादा केली असल्याची माहीती नुतन उपाध्यक्ष अजित आव्हाड यांनी दिली.         संचालक मंडळाची नुकतीच पहिली बैठक अध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली असुन त्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करण्यात यावी, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यास सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी दिली असुन, सदरची वाढ दि. ०१ डिसेंबर २०१९ पासून लागू होण

वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय! इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून- माई घाट : क्राइम नं.103/2005. कुणी पटकावला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय! 'इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून 'माई घाट :  क्राइम नं.103/2005'  च्या    उषा जाधवने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!   मराठी सिनेमांनी नेहमीच गरुडझेप घेत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेला  'माई घाट : क्राइम नं.103/2005'    हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून भारतासोबतच परदेशांमधीलही आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकाची थाप मिळवत आहे. नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडीया (इफ्फी)मध्येही या चित्रपटाने आपलं अस्तित्व कायम राखले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या  'माई घाट :  क्राइम नं.103/2005'   या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील ७६ देशांमधील एकूण २०० सिनेमांमधून निवडलेल्या १५ उत्कृष्ट सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींमधून उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निव

२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा ! कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र !! इतिहासात पहिल्यांदाच असे घडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या , कुठे घडले !!!!

इमेज
२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !! मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक !! नासिक::- जिल्हा परिषदेत आज अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ६२ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. सन २०१४ पासुन कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली नव्हती मात्र आज अनुकंपा तत्त्वावर ६२ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.        शासननिर्णयानुसार सेवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्हता यांची सांगड घालत नियुक्ती पत्र देण्यात आली. आजच्या नियुक्त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद करावी अशा ठरल्या. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून समुपदेशनाद्वारे रिक्त जागांपैकी उमेदवाराने निवड केलेल्या ठिकाणी तत्काळ नियुक्ती चे पत्र देण्यात आले.          या ऐतिहासिक नेमणुका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रविंद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, गांगुर्डे, राजेंद्र देसले, महेंद्र पवार, रणजित पगारे, आदींच्या उपस्थितीत देण्यात आल्या. ***********************************