पोस्ट्स

शैक्षणिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर! करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क: 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा          नासिक::-कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यापासून ते स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांच्यापर्यंत सर्वच कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी मविप्रच्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहे. शंभर वर्षांपूर्वी रोपटे लावलेल्या मविप्रचा वटवृक्ष कर्मवीरांच्या त्यागातुनच बहरला आहे, असे प्रतिपादन जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. गोदाकाठच्या करंजगाव मविप्र जनता विद्यालयात  त्यांच्या अध्यक्षतेखाली समाजदिन उत्साहात साजरा करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मविप्र तालुका संचालक प्रल्हाददादा गडाख, शालेय समिती अध्यक्ष भास्करदादा राजोळे, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, सरपंच अनिता भगूरे, मा.सरपंच खंडू बोडके-पाटील, धोंडूमामा भगूरे, सुरेशबापू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, सोमनाथ राजोळे, देवकर भाऊसाहेब

शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक !  नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून  निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील  कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           कांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले  महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने  पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही  कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील

सुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस ! तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
            नासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी   पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा  मान मिळवत देशात  ५०७ वे  मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव  कानाकोपऱ्यात  पोहोचवल्याने तालुक्यात  तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला,           सुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मानूर येथील  शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य प

कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे मान्यवरांकडून कौतुक व सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत कष्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.०० गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! नासिक::- न्यूज मसाला कडून प्रकाशित केलेल्या "बातमी अशी कुठे असते का ? या मथळ्याच्या बातमीची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून तत्काळ घेण्यात आली होती, जागतिक महामारी कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर आॅनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आले होते, सदर प्रमाणपत्र ओम व शिवानी या जुळ्या भाऊबहीणीला नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.         जुळ्या भाऊबहीणीला प्रत्येक विषयात वेगवेगळे गुण आहेत मात्र एकत्रित गुणांची टक्केवारी समान मिळाली, न भूतो न भविष्यती असेच वर्णन असलेली ही घटना.          महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून पाठविण्यात आलेले प्रमाणपत्र प्रदान करतेवेळी ओम व शिवानी सोबत त्यांचे पालक श्री व सौ सुनील बिरारी, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, माय मराठी वृत्तवाहीनीचे सुनील निकम उपस्थित होते. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांना लीना बनसोड यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले, कोणत्याही क्षेत्रात शिक्षण

वैनतेय विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची १० वी बोर्डाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस वैनतेय विद्यालयाचा  इयत्ता १० वी बोर्डाचा   निकाल  ९४.६०  टक्के          नासिक::-निफाड  शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या वैनतेय  विद्यालयाचा गत अनेक वर्षांपासूनचा  इयत्ता १० वी  बोर्डांच्या निकालाची उत्तुंग परंपरा याही वर्षी सुरू ठेवत ९४.६०  टक्के लागला आहे, विद्यालयाने या वर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. वैष्णवी मनोज लाहोटी ही विद्यार्थिनी  ९८  टक्के गुण मिळवून या विद्यालयात प्रथम क्रमांकाने आली आहे. १० वी परीक्षेसाठी या विद्यालयाचे   ३८९  विद्यार्थी प्रविष्ट झाले  होते यातील ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले  आहेत, यातील विशेष प्राविण्य श्रेणीत   १७७ विद्यार्थी, प्रथम  श्रेणीत ८६  विद्यार्थी , द्वितीय  श्रेणीत  ८३ विद्यार्थी , तृतीय  श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त  गुण मिळाले आहेत       या विद्यालयात आलेले  प्रथम ५ गुणवंत  विद्यार्थी   पुढीलप्रमाणे प्रथम-  वैष्णवी मनोज  लाहोटी ( ९८ टक्के) -  ,द्वितीय - अमित ज्ञानेश्वर कापसे - ( ९६.२० टक्के ) ,  तृतीय-  विजया यशवंत  कुंद

बातमी अशी कुठे असते का ? एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान गुण !! हेच विशेष आहे या बातमीत, खालील लिंकवर क्लिक करून वाचा व कमेंट बाॅक्समध्ये अभिप्राय नोंदवा !!!

इमेज
                             नासिक::- येथील बाॅईज टाऊन शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान ८८.२०% गुण मिळाले. यांत काही विशेष नाही असे आपल्याला वाटत असेल तर ही बातमी वाचायलाच हवी.         ओम आणि शिवानी यांनी जे समान गुण मिळविले हा नासिक नव्हे तर जगभरातील तमाम वाचकांसाठी कुतुहलाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारणही तसेच आहे, असा विक्रम भविष्यातही लवकर घडेलच असं छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही.           नाशिक येथील आई इव्हेंट्स या संस्थेचे संचालक सुनील बिरारी हे मूळचे पाळे ता.  कळवण येथील असून सध्या व्यवसायानिमित्त वास्तव्यास नाशिक येथे आहेत. यांचे जुळे मुलगा व मुलगी (भाऊ बहीण) यांना इयत्ता दहावी शालांत परीक्षेत (२०१९-२०) दोघांनी समान (८८.२०%) गुण मिळविले आहेत, विश्वात अनेक विक्रम प्रस्थापित होत असतात मात्र असा विक्रम प्रथमताच घडल्याचे दिसून येते व भविष्यात लवकर कधी होणार हे सांगणे शक्य नाही,  कौतुकास्पद बाब तसेच हा विशेष योगायोग आहे.      जुळ्यांचा चेहरा राम और शाम असतो असे अनेक चित्रपटात वा वास्तवात आढळून येते, मात्र मुलगा आणि मुलगी हा जन्मताच बदल असलेले ओम आ

मुख्याध्यापक दिनेश साळुंके अर्थात मदतीला धावून जाणारा खरा कोरोना योद्धा ! त्यांचा सत्कार म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्वाचा सत्कार - प्रशांत जानी, डिस्ट्रिक गव्हर्नर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कोरोना योद्धा सन्मान     कोरोना संचारबंदी,लाॅकडाऊन काळात नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात गरजू कुटुंबांना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खाजगी डाॅकटरांना पी.पी.ई. किटचे वाटप,माकस्चे मोफत वाटप, कोविड १९ आजारा संदर्भात जनजागृती करून अवरॅनेसचे काम, काळजी व उपाय संदर्भात सोशल मिडीया द्वारे माहिती प्रसिध्द केली.           २३ मार्चपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये मुख्याध्यापक दिनेश साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मदत केली, मदतीसाठी मित्रपरिवारामार्फत गरजूंची माहीती घेत शक्यहोईल तितकी मदत पोहोचविली. शाळेला सुट्टी असूनही नंदूरबार व विखरण येथेच थांबणे पसंत केले, याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्राद्वारे सत्कार केला. मात्र आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी साळुंके यांचे कार्य फक्त प्रशस्तीपत्राने न करता महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी यांच्या हस्ते केले. यावेळी जानी यांनी सांगितले की, साळुंके यांच्यासारखे मुख्याध्यापक म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्व आहे.          आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्

नासिकच्या शिक्षकाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद !!! शैक्षणिक उपक्रम 'रविवारचा विरंगुळा" !!! कौतुक तर होणारच पण का ? उपक्रमाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नितीन प्रभू केवटे यांच्या ‘रविवारचा विरंगुळा’ या शैक्षणिक उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद            नासिक::-त्र्यंबकेश्वर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे (जन्म ०२ नोव्हेंबर १९८९) यांनी प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी 'रविवारचा विरंगुळा' या आदर्श शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चार भिंतीच्या बंदिस्त खोलीत पूर्णत्वास येऊ शकत नाही. शिक्षण हे सहज निरीक्षणातून व कृतीतून घडते आणि समृद्ध होते. अनौपचारिक शिक्षणात व्यवसाय शिक्षण व जीवन शिक्षण देण्यासाठी मुलांच्या साह्याने शाळेत सिमेंटचा १२ x १४ फूट जागेवर ३ फूट उंच असा मजबूत किल्ला उभारला, सिंटेक्सच्या टाकाऊ टाकी पासून शौचालय निर्मिती, झाडाला सिमेंटचे चबुतरे, जुन्या लाईटच्या खांबाचा उपयोग करून हँडबॉल व व्हॉलीबॉल कोर्टची निर्मिती, शाळेतील टाकाऊ बँडच्या पत्र्यापासून घड्याळ व संख्यावाचन शैक्षणिक साहित्याची निर्मिती, गावातील भजनी मंडळाचा कार्यक्रम, मातीकाम, माळीकाम प्रशिक्षण, गावच्या पाणवठ्या