जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन!
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ! नाशिक ( प्रतिनिधी ) - येथील वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि. १ ते ८ मे दरम्यान समूह वारली चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व रंगकर्मी सतीश मोहोळे उपस्थित राहणार आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नाशिकरोड येथे पासपोर्ट ऑफिसशेजारी शोरूम आहे. त्याठिकाणी वातानुकूलित कलादालन तयार करण्यात आले आहे.तेथेच हे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. नाशिककर रसिकांना उत्तम वारली चित्रे बघण्याची व खरेदी करण्याची यानिमित्ताने संधी मिळेल. यासंदर्भात प्रदर्शनाचे संयोजक वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी माहिती दिली. समूह वारली चित्रप्रदर्शनात अपूर्वा भंडारे, स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, विलास देवळे, सुप्रिया देवधर, गौरवी घोडके, हर्षदा माळी, आबा मोरे, सोमेश्वर मुळाणे, ...