NITI Aayog Releases Report - Promoting Millets in Diets: Best Practices across States/UTs of India आहारामध्ये भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात यावरील नीती आयोगाचा अहवाल जारी !
NITI Aayog Releases Report - Promoting Millets in Diets: Best Practices across States/UTs of India आहारामध्ये भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात यावरील नीती आयोगाचा अहवाल जारी ! नवी दिल्ली::-'आहारात भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात' या शीर्षकाचा अहवाल नीती आयोगाने प्रसिद्ध केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी हा अहवाल जारी केला. यावेळी सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल, सदस्य (कृषी) डॉ. रमेश चंद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम उपस्थित होते. हा अहवाल राज्य सरकारे आणि संस्थांनी भरडधान्य मूल्य-साखळीच्या विविध पैलूंमध्ये विशेषतः उत्पादन, प्रक्रिया आणि वापरामध्ये अवलंबलेल्या चांगल्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा एक संच सादर करतो. अहवाल तीन संकल्पनांमध्ये आहे. म्हणजे (अ) भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मिशन आणि उपक्रम; (ब) आयसीडीएस मध्ये भरडधान्यांचा समावेश; (क) संशोधन आणि विकास आणि नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी तंत्रज्ञानाचा वापर. हा अहव