स्वातंत्र्यदिन विशेष पुन्हा एकदा देश स्वतंत्र्य करावा लागणार नाही ! अंकुश शिंगाडे यांजकडून(संस्कार), यां लेखांतील विषय हा लेखकाचे संस्कार लेखमालेतील मनोगत आहे, सर्वच शिक्षकांबद्दल असे मत नाही, प्रासंगिक लिखाण असुन गैरसमज नसावा, लेखक, अंकुश शिंगाडे. शिक्षक शिस्त लावतात की मानसिक त्रास देतात ते आता कळेनासे झालेय.विद्यार्थी शिकला पाहिजे.त्याने ज्ञानाचे बाळकडु प्याले पाहिजे असे आपण म्हणतो.त्याला शिस्तही लागली पाहिजे असेही आपण म्हणतो.पण शिस्त काही दोन मिनिटात लागणारी गोष्ट नाही.शिस्त लावतांना कोणताही त्रास देवु नये. एका शाळेची गोष्ट सांगतो.पंधरा आँगष्टचा कार्यक्रम अगदी आठ दिवसावर येवुन ठेपला होता.मुलांजवळ शालेय गणवेश होता.पण जोडे मोजे नव्हते.तसेच काही मुलींनी रिबीनही बांधलेल्या नव्हत्या.कपाळावर काही मुलींनी टिकल्या लावलेल्या ...