पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहशालेय उपक्रमांची माहिती असलेल्या "यशोगाथा" पुस्तकाचे आज प्रकाशन !

इमेज
सहशालेय उपक्रमांची माहिती असलेल्या "यशोगाथा" पुस्तकाचे आज प्रकाशन !       नाशिक(२९)::- सुरगाणा तालुक्यातील वांगणपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय बागुल यांच्या पुणे येथील, वैशाली प्रकाशन प्रकाशित 'यशोगाथा' या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सहशालेय उपक्रमांची माहिती देणाऱ्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आज (दि.२९जानेवारी रोजी) दुपारी १२ वाजता होणार आहे.      सावानाच्या ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भगवान फुलारी, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.      सुरगाणा गटविकास अधिकारी दीपक पाटील, कळवण गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, सुरगाणा गटशिक्षणाधिकारी लता भरसट, कळवण गटशिक्षणाधिकारी, एस. जी. बच्छाव, कळवण पंचायत समिती सभापती जी. पी. साबळे, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, मन

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा !

इमेज
आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा !      मुंबई (महेश कदम)::- "आरंभ प्रतिष्ठान" च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी, दादर, माहिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ, मानाची शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार कालिदास कोळंबकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, माजी नगरसेवक नाना आंबोले, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष नरेंद्र गावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख आयोजक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत धावले, इंद्रजित तिवारी, विकास माने, जितेंद्र कांबळे, चारुहास हंबीरे, जयवंत पवार, विकेश जैन, ओमकार गुरव, जितेंद्र गुप्ता, दादा शिरसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ ची झळाळी ! ‘आयबीटी’ला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर !!

इमेज
‘आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ ची झळाळी !   ‘आयबीटी’ला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर !!      नाशिक : दुबईस्थित मॉडेलद्वारा सादर करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ आणि कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक मुळे आयबीटीला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर करण्यात आली. सुमारे तीनशे सौंदर्यवतींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थितांना लाभलेले सौंदर्यशास्त्रातील करियर मार्गदर्शन हा चतु:ष्कोन आयबीटीद्वारा नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करून गेला.          आयबीटी संस्थेच्या वतीने हॉटेल सेलेब्रिटा येथे सदर सेमिनाररुपी कार्याक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दुबईस्थित मॉडेल क्रिस्टीना हिने आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ सादर केला. उपस्थित  सौंदर्यवतींच्या अपेक्षेला साद घालत केलेल्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका मॉडेलने प्रथमच कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक सादर करून सौंदर्यवतींची वाहवा मिळवली. या दोन्ही सादरीकरणातील मॉडेल्सचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप आर्टिस्ट भ

"बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक !

इमेज
  "बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक ! तालुका विज्ञान प्रदर्शनात देवरे विद्यालयाच्या भावीन बोरसे यास तृतीय क्रमांक प्राप्त !!        खोंडामळी (प्रतिनिधी)::- श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील इ.१०वी चा विद्यार्थी भाविन किशोर बोरसे याने सादर केलेल्या 'बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा' या उपकरणाने शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार व  नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला. सदर विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यालय सेजवा ता.जि.नंदुरबार येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) सतिष  चौधरी यांच्या हस्ते भावीन बोरसे यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरांकित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी डाॅ.युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी ( माध्य.), निलेश पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार, जिल्हा मुख्याध्यापक सं

अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर !

इमेज
अखिल भारतीय मराठा महासंघाची नाशिक कार्यकारिणी जाहीर !      नासिक (प्रतिनिधी)::- अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. नाशिक शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात नाशिक शहर युवक सरचिटणीस पदी उमेश अहिरे, नाशिक शहर युवक कार्याध्यक्ष पदी आशिष पुरी, नाशिक ग्रामीण मध्ये देवळा तालुका युवक अध्यक्ष पदी रविन्द्र पवार व बागलाण तालुका युवक अध्यक्ष पदी संदीप अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत पदभार सोपविण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !

इमेज
महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !      नासिक::- पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये दिनांक ०९ ते १२ जानेवारी या कालावधीत "महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्स २०२३" अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, या क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील क्रीडा स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपापल्या परीने उत्तम कामगिरी करत पदक मिळविले, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडा स्पर्धामध्ये वुशू या खेळात नाशिक जिल्ह्यातून "वुशू असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट" च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यांत मेघा पवार (सानसू) ब्रॉन्झ मेडल, अनिशा वर्मा (तावलू चनकॉन) ब्रॉन्झ मेडल असे दोन पदक प्राप्त केले. शिवाय महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नाशिक तर्फे प्रणाली शिंदे, यशस्वी साळवे आणि उमेश थोरे या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदविला व आपापल्या खेळांचे उत्तम प्रदर्शन करून पदक मिळविण्याचा प्रयत्न केला.        या सर्व खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक व वुशू असोसिएशन नाशिक डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष व कोच राजुराम जैस्वाल यांचे मार्गदर्शन मिळाले. झाले

नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !!

इमेज
नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !! नाशिक (प्रतिनिधी)::- येथील नमस्ते फाऊंडेशनच्या वतीने ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आंबेगण, तालुका दिंडाेरी येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.         सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते फाऊंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी काैतूक करून आभार मानले. यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल संदीप देव व आनंदी ग्रूपचे सहकार्य लाभले. याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार, सुनीता वाणी, ज्याेती ठक्कर, आरती पाटील, शैला साठे, विजया लाेणारी, रितू अग्रवाल, वंदना गाडीलकर, दीप्ती साेनजे, संदीप देव, डॉ. आनंद अहिरे, दीपक अग्रवाल, राजेंद्र गुप्ते, आंबेगावचे सरपंच, उपसरपंच, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित हाेते.

युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

इमेज
युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी      नाशिक : " छत्रपती शिवरायांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि इतिहासातील ध्रुवतारा स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. या दुर्मिळ योगावर आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सारख्या मानवतावादी संघटनेच्या युथ रेडक्रॉस या उपयुक्त उपक्रमाला नाशिकचे युवक आपलेसे करत आहेत ही नाशिक रेडक्रॉस साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या युथ रेडक्रॉस च्या वाटचालीत आम्ही खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन नाशिक रेडक्रॉस चे चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. मविप्र चे आर्किटेक्चर कॉलेज आणि नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या युथ रेडक्रॉस शाखांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर पी. एम. भगत होते तर सुप्रसिद्ध वास्तुरचना तज्ज्ञ प्रसन्न भोरे, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.विजय वाघ, आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्रा.आशीष खेमनार , प्रा. मेघा बुटे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच ! "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!

इमेज
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच !  "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!          नाशिक ( प्रतिनिधी ) - प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा  ‘बांबू’ चित्रपट लवकरच दि.२६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.     क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरूणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. य

महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !

इमेज
महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापिठ, विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित १७व्या आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्प स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालय संशोधन केंद्राच्या पीएच. डी. विद्यार्थिनी, कु. सोनाली प्रकाश शिराळकर यांच्या महिला पोलीसांवरील संशोधन प्रकल्पास अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक मिळाले. मागील दोन वर्षासह सलग तीनही वर्षी त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली व त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. मुंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांच्या संशोधन प्रकल्पाचा विषय होता "मुंबईतील महिला पोलीसांमधील सामर्थे, संधी, दुर्बलता व आवाहनांचे विश्लेषण" (A Study on SOWC Analysis of Women Police in Mumbai Region).       यानंतर कु. सोनाली  राज्यस्तरीय आविष्कार आंतर-विद्यापीठ स्पर्धेत मुंबई वि

पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्यावतीने स्वेटर वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

इमेज
पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्यावतीने स्वेटर वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !           सांजेगांव(ता.इगतपुरी):- पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था नासिक आणि जिल्हा परिषद नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा सांजेगांव येथील २४० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.      दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.         याप्रसंगी निवृत्ती जाधव यांनी बोलताना पत्रकार फक्त बातमीच घेण्यासाठी येतात असे नाही तर ते समाजाचा आरसा बनून येतात, राजकारणी व प्रशासनाकडून प्रश्नांची सोडवणूक करून घेतात, यापलीकडे जाऊन या संस्थेने आज विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून जांभेकरांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले यातून पत्रकारांची समाजाप्रती असलेली

'गोष्टीपलीकडचे महाभारत' सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल - दीपक केसरकरमहाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे - प्रा. डॉ.खांडगे

इमेज
'गोष्टीपलीकडचे महाभारत' सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल - दीपक केसरकर महाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे - प्रा. डॉ.खांडगे       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'गोष्टीपलीकडचे महाभारत' हा स्वाती काळे लिखित ग्रंथ म्हणजे महाभारतातील विविध प्रसंग पात्रे यांची मौलिक मांडणी आहे. हे पुस्तक मराठी भाषेच्या समृद्धीत निश्चितच भर टाकेल. वस्तू व सेवा कर या विभागांमध्ये सहआयुक्त पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना स्वाती काळे यांनी आपल्या चित्रमय शैलीतून महाभारतातील विविध घटनांचे आणि पात्रांचे जे चिंतन मांडले आहे, ते पथदर्शी ठरेल. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' च्या पुढच्या भागाची तयारी स्वाती काळे यांनी करावी, असे मत मुंबईचे पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांनी रवींद्र नाट्य मंदिर मधील मिनी थिएटर मध्ये  व्यक्त केली. स्वाती काळे यांच्या 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या ग्रंथाचे प्रकाशन मंत्री महोदयांच्या हस्ते झाले.        प्रकाशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाला

“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसह वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरुवात !

इमेज
“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसह वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरुवात !       मुंबई::- आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असलेल्या `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरूवात झाली आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन करण्यात आले असून यात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या विभागात विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसाठी संपूर्ण कचऱ्यापासून बनलेल्या साम्राज्यासारखी भव्य कृती ही या महोत्सवाचे विशेष आकर्षण होती. वृत्तपत्रे, फ्रीज बॉक्स आदींपासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. उद्घाटनपर कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्य सादर केले.  या महोत्सवाबाबत बोलताना संस्थेचे सरचिटणीस अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी तसेच करिअर करण्याच्या दृष्टीने पर्वणी ठरणार आहे. हा महोत्सव त्यानिमित्ताने संकल्पित करण्यात आला असून त्याचा उपयोग निश्चितपणे सकारात्म

बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार

इमेज
  बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार           यवतमाळ::- बोधिसत्व फाउंडेशन आणि सलोखा समूह गटाच्या वतीने यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजशास्त्र महाविद्यालयात,  सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. चौदा शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. सामाजिक सलोखा या विषयावरील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रमोद मुजुमदार आणि निशा साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.       मुजुमदार यांनी, अखंडप्राय आपला भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने सरसावतो आहे तेव्हा सामाजिक सलोखा बाळगणे ही काळाची गरज आहे, आपली एकसंधता हीच खरी शक्ती आहे असे मत उद्घाटनप्रसंगी मनोगतात व्यक्त केले.         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बोधिसत्व फाउंडेशनच्या अमृता खंडेराव आणि सौ. प्रज्ञा तांबेकर यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजातील सर्व घटकांबद्दल जिव्हाळ

आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध रहावे तालुका पत्रकार संघ कार्यक्रमाप्रसंगी लीना बनसोड यांचे प्रतिपादन ! साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे यांचा सन्मान !

इमेज
आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध रहावे तालुका पत्रकार संघ कार्यक्रमाप्रसंगी लीना बनसोड यांचे प्रतिपादन ! साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे यांचा सन्मान !       देवळाली कॅम्प :- पत्रकारिता क्षेत्रात निष्पक्षपणे काम करण्याबरोबर आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध राहणे आवश्यक असतांना सामाजिक जबाबदारीचे भान राखत तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा घटकांचा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ करीत असलेल्या गौरव लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले.     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,(मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार येथील डॉ गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप, तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन, अभिनेते डॉ. चैतन्य बागुल, दिग्दर्शकी विनोद लवेकर,अभिनेत्री रसिका वाघाराकर,कृष्णा मरकड,शंकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नवीन गुरुनानी, सेक्रेटरी रतन चावला,संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, गणेश गायधनी,नाशिकरोड बार असो

राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री

इमेज
राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री मुंबई ::- पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.         आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्कने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.         मुख्यमंत्री म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सह

आजपासून 'युन्योया’ महोत्सव ! वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडून ६ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजन !!

इमेज
आजपासून 'युन्योया’ महोत्सव ! वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडून ६ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजन !!           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)::- आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असलेल्या 'युन्योया’ महोत्सवाचे शानदार आयोजन ६ ते २१ जानेवारी २०२३ या कालावधीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थाने पर्वणी ठरणार आहे. तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही मोठी पर्वणी राहिल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.  आंतरमहाविद्यालयीन संगीत, नृत्य, फॅशन, क्रीडा, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान, व्याख्याने असे या महोत्सवाचे स्वरुप आहे. त्यासाठी अनेक पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी निमंत्रित केले आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सरचिटणीस अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव शीव येथील संस्थेच्या संकुलात होत आहे. यासाठी सोहम शिंदे, भूमिका सै

मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !

इमेज
मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !    नासिक::- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ३१ जुलै २०२२ च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा काल जाहीर झालेल्या आठवी स्काॅलरशिप (शिष्यवृत्ती) परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार कु. आदिती उदय शिरोडे हिने मराठा विद्यालयातून प्रथम तर  नाशिक जिल्ह्यातून पाचवा, नाशिक मनपा क्षेत्रातून तिसरा क्रमांक मिळवला. याबद्दल तिचे सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !

इमेज
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !         नाशिक : देशातील प्रतिभावंत आणि हुशार विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देण्यासाठी १९८६ सालच्या शैक्षणिक धोरणामध्ये नवोदय विद्यालय स्थापनेची तरतूद करण्यात आली, या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षेची आयोजन हे दरवर्षी करण्यात येते. यावर्षी देखील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.          जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी ३१ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याबत माहिती पोहचवण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. जे विद्यार्थी, विद्यार्थिनी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे, ज्यांची

६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !

इमेज
६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भरारी प्रकाशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाती काळे (सहआयुक्त, वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई) लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि 'विश्वातील १० आदर्श शिक्षिका' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर, (रवींद्र नाट्यमंदिर), तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या स्वाती काळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई शहर व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, धर्मशास्त्र, पुराभिलेख विद्या, भारतीय स्त्रीवाद व सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासक डॉ. प्राची अमोघ मोघे, लोकसाहित्य व लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे, कोकण मराठी साहित्य पर

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !

इमेज
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !       सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी एका शिक्षण संस्था चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली असता २५ हजार रुपये तडजोडी अंती ठरलेली रक्कम स्विकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पकडण्यात आले होते, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही बाबी समोर आल्या. या शिक्षणाधिकाऱ्यांची एकूण कारकीर्द फक्त ९ वर्षांची आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक म्हणून दुहेरी जबाबदारी होती. मात्र तेथून त्यांना २०१८ मध्ये पदमुक्त करण्यात आल्यानंतर न्यायालयातून त्यांनी पदनियुक्ती करून आणली होती, १३ महीन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर रुजू झाले होते. इथेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व चौकशीत त्यांच्याकडे ५० कोटींच्या आसपास मालमत्ता आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे. लोहार यांच्याकडे पाच चारचाकी वाहने, सात दुचाकी, कोल्हापूरात दोन फ्लॅट, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, राजारामपुरी, पाचगाव, शा

मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर !

इमेज
मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर ! नाशिक::- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते दु. ०४:०० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.  

सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !

इमेज
सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध ! सलग तिसऱ्या वर्षी १ जानेवारी रोजी ५२ संवर्गांच्या ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध !!             नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. सलग तिसऱ्या वर्षी सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सेवा ज्येष्ठतेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेसंबधी सूची हि प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर रोजी तयार करण्यात येऊन १ जानेवारी रोजी प्रसिद्ध  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने यावर्षी देखील गट क व गट ड संवर्गातील सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ५२ संवर्गाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या ह्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत असलेल्या गट क व ड मधील १६००० कर्मचाऱ्यांच्य

पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!

इमेज
पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!        पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली व उत्साहात प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन झाले. विज्ञान व आध्यात्मिक शक्ती यांचा समन्वय घडविणारे सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील.      उद्या पासून दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. उद्या दि.२ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल. दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्

मराठा इतिहास विश्वकोश निर्मितीसाठी प्रयत्नशील !भारतीय इतिहास संशोधन परिषदेचाशिवाजी विद्यापीठासमवेत करार !

इमेज
मराठा इतिहास विश्वकोश निर्मितीसाठी प्रयत्नशील ! भारतीय इतिहास संशोधन परिषदेचा शिवाजी विद्यापीठासमवेत करार !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश अशोक कदम यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी अकरा वाजता परिषदेच्या वतीने त्यांचा आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासमवेत इतिहासासंदर्भात महत्वाच्या देवाण-घेवाणविषयीचा करार होत आहे. यात प्रामुख्याने मराठा इतिहासाच्या विश्वकोशाची निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राहणार आहे.            छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीजच्या सामग्री व हस्तलिखिते यांच्यावरील अभ्यासासाठी देवाणघेवाण, त्यांचे डिजिटलायझेशन, स्थानिक भाषेवर आधारित मराठा इतिहासावरील १० मोनोग्राफ प्रकाशित करणे, संशोधन पद्धती तसेच स्त्रोत यांच्यावरील कार्यशाळेचे आयोजन, मराठा इतिहासावरील स्थानिक परिसंवाद, मोठ्या संशोधन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे, ई-लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये सहभागी करणे तसेच ऑनलाइन व्याख्यानांची मालिका, मराठी भाषा आणि मोडी लिपी ऐतिहासिक अर्थ

आजपासून गायत्री महायज्ञ, संस्कार महोत्सव !

इमेज
आजपासून गायत्री महायज्ञ, संस्कार महोत्सव ! पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तेथे मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन होईल. सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील.     दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. दि. २ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल. दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्त कच्छी गुजराती परिवार व गायत्री महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३७२०५२८२२ व ९८२३१३७०७५ या क्रमांकावर संपर्क साधता य