तुषार जगताप यांची नाशिक शासकीय जिल्हा रुग्णलाय समन्वय समितीवर निवड ! आजारांवरील उपचारासाठी चे सहकार्य व मार्गदर्शनसाठी संपर्क साधण्याचे आवाहन !! सविस्तर माहिती व बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
पालकमंत्री नामनिर्देशित सदस्य म्हणून तुषार जगताप यांची नाशिक शासकीय जिल्हा रुग्णलाय समन्वय समितीवर निवड. नासिक::- आरोग्यदूत म्हणून स्वतःच्या कामातून ओळख निर्माण करणारे युवक मराठा महासंघाचे तुषार जगताप यांची महाराष्ट्र शासनाने शासकीय जिल्हा रुग्णालय समन्वय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.या नियुक्तीने कामाचा खरा सन्मान झाल्याची भावना व्यक्त करताना तुषार जगताप यांनी भविष्यातही यापेक्षा अधिक गतीने रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. तुषार जगताप हे युवा मराठा महासंघाचे राज्य पदाधिकारी असून गरजवंत रुग्णांना तात्काळ उपचार आणि प्रसंगी आर्थिक मदत मिळवून देणे हा त्यांचा छंद आहे. सुरुवातीला व्यक्तिगत पातळीवर छंद जोपासत आपल्यासारख्या तरुणांची फळी उभी करून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचे काम त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून निर्माण झालेला मोठा जनसंपर्कही त्यांनी रुग्णसेवेला लिलया वाहून घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर प्रचारप्रसार झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी पैसे न