पुस्तक परीक्षण. भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध ! सविस्तर परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
पुस्तक परीक्षण भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध "वृत्तपत्रविद्या हे सतत गतिमान होत जाणारे निरंतर परिवर्तनशील शास्त्र आहे. सध्याच्या वेगवान युगात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण याप्रमाणेच भौगोलिक पत्रकारितेचे शास्त्रीय कौशल्य विकसित होत आहे. त्यात प्रगत वार्तांकन आणि लेखन कौशल्याचा समावेश होतो. मानवाने निसर्गाशी साधलेल्या सुसंवादातून व संघर्षातून निर्माण झालेल्या या क्षेत्राचे सोपे वर्णन 'भू - पत्रकारिता' असे करता येईल. भूगोल व पत्रकारिता हे दोन विषय शिकविणाऱ्या प्रा. डॉ. एम. जी. कुलकर्णी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संशोधनपर प्रबंध सादर केला. त्याचेच 'भू- पत्रकारिता' हे पुस्तक ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या हस्ते प्रकाशित झाले, हा मी माझा बहुमान समजतो. अभ्यासप्रवृत्त करणारे हे पुस्तक तरुण पत्रकारांना नवी दिशा, नेमका दृष्टिकोन देईल. प्रा.डॉ. एम.जी. कुलकर्णी हे अतिशय अभ्यासू व संशोधक वृत्ती असणारे व्यक्तिमत्त्व आह...