डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे ! स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये !
डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे ! स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक खासदार भारतीताई पवार यांचा दोन लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत प्रवेश झाला. लोकसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना मराठीतून केलेले भाषण आणि खासदार प्रीतम मुंढे व रक्षा खडसे यांना आलेले हसू याचा व्हायरल झालेला व्हिडिओ काय दर्शवित होता हे प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळे भाव निर्माण करुन गेला. मात्र नासिक जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मिळालेला मान उल्लेखनीयच म्हणावा लागेल. शिवाय राज्यमंत्री म्हणून शपथ घेणे यासाठी मुंढे आणि खडसे यांचे हसणे, दोन लाखांचे मताधिक्य, पहिल्या महिला खासदार, पाणीदार नेते ए. टी. पवार (दादासाहेब) यांच्या स्नुषा, जिल्हा परिषद सदस्य या कारकिर्दीचा तसेच उच्चशिक्षित यापैकी कशाचा निकष असेल ? काहीही असो, राज्यमंत्री होण्याचा मान प्राप्त होणे अभिनंदनीयच. यामुळे जिल्ह्यातील समस्त हितचिंतकांना आनंद तर होणारच आणि अपेक्षाही वाढणार यांत शंका नाही. या