शब्दगंध च्या पाथर्डी शाखेतर्फे साहित्यिकांचा सन्मान सोहळा संपन्न !
शब्दगंध च्या पाथर्डी शाखेतर्फे साहित्यिकांचा सन्मान सोहळा संपन्न ! पाथर्डी (प्रतिनिधी)::- मराठी साहित्य हे आपल्या माय बोलीतील साहित्य असते, ते अनुभवाने समृद्ध बनलेलं असतं आणि त्याला प्रवाहित करण्यासाठी साहित्यिकांची गरज असते, मराठी आपली माय बोली तसेच राजभाषा असल्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी.ढाकणे यांनी केले. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पाथर्डी शाखेच्या वतीने श्री तिलोक जैन माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते, मराठी साहित्यात भर घालणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, मकरंद घोडके, पर्यवेक्षक विजयकुमार घोडके हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी दिलीप सरसे यांचा 'दिंडी 'आणि 'कट्टा ' या कादंबरी बद्दल, श्रीमती विद्या भडके यांचा 'उठे तुफान काळजात' या काव्यसंग्रहाबाबत, प्रा.डॉ.सुभाष शेकडे यांच