नासिक पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंघल यांची आजपर्यंतची कार्यपद्धती हि नासिककरांच्या अंगवळणी पडली व कौतुकही होत आहे , ती सामाजिक पोलीसींग च्या माध्यमांतून राबविलेल्या उपक्रमांची. तिचे नासिककर मनापासुन स्वागत करीत आहेत. याऊलट शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नासिककरांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहर वाहतूक शाखेचे चार विभाग केले आहेत, वाहने टोईंग करणे विभाग एकमध्ये केले जात आहे, कारण टोईंग केलेल्या वाहनांना जमा करण्यासाठी इतर तीन विभागांत जागा नाही व ती लवकरांत लवकर उपलब्ध करण्याचे त्यांनी जाहीर केले. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना मनपाच्या महासभेस उपस्थित रहावे लागते, तसेच वेळोवेळीही त्यांचा मनपाशी कायम संपर्क असतो तरीही त्यांनी मनपाशी पार्कींग झोनबाबत यंयुक्तपणे प्रयत्न करण्याऐवजी फक्त ठेकेदाराचं कल्याण व नासिकरांना दंडाचा भुर्दंड , याचाच विचार केलेला दिसतो, यासंदर्भात नागरिकांनी नासिक पोलीस आयुक्त डाँ रव...