आज रंगणार रफी गीतांची सुरेल मैफल !
आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल, रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल. नाशिक ( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने 'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०५:३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल. लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी ...