तीन बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी !
तीन बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी ! राज्यस्तरीय लाईव्ह कार्यशाळा आयोजनामुळे बालहृदयरोग तज्ञांची स्तुतीसुमने ! नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- वरिष्ठ बालहृदयविकार तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळावे तसेच बालहृदयउपचार करताना कोणत्या पद्धतीने काळजी घेतली जावी या उद्देशाने उत्तर महाराष्टातील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच राज्यस्तरीय दोन दिवसीय लाईव्ह वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील वरिष्ठ बालरोग व जन्मजात हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश राव यांनी उपस्थित बालरोगतज्ञ, सर्जन आणि फिजिशियन यांना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय आयोजित कार्यशाळेत ३ बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. मुंबईतील बालरोग व बालहृदयविकार शस्रक्रिया तज्ञ डॉ. सुरेश राव व एसएमबीटी हॉस्पीटलामधील हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालहृदय विकार व कन्जनायटल हार्ट शस्रक्रिया या विषयावर लाईव्ह कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, ऑपरेशन थिएटरमधून थेट ऑडिओ व्हि