अध्यात्मिकता अन् कलेेमुळे ‘चिमुकल्याची’ कॅन्सरवर मात !

अध्यात्मिकता अन् कलेेमुळे ‘चिमुकल्याची’ कॅन्सरवर मात ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801 ‘लोटस’ हॉस्पिटलमध्ये उमलत्या ’फुलाला’ अशीही संजीवनी : डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या प्रयत्नांना यश नाशिक ( प्रतिनिधी)::- ‘अॅक्यूट’ ल्युकेमिया अर्थात रक्ताचा झपाट्याने पसरत जाणार्या कर्करोेगावर निफाड येथील अवघ्या अकरा वर्षाच्या चिमुकल्याने डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या उपचाराने यशस्वी मात केली. वारकरी संप्रदायातील पालकांचा हा पाच वर्षांचा चिमुकला पखवाज वादक असून तो स्वत:ही सुरेख वादन करत असतो. त्याची वादन कला आणि घरातील आध्यात्मिक वातावरणाने त्याच्या उपचाराला जलद प्रतिसाद मिळाला असून तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती डॉ. प्रितेश जुनागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, निफाड तालुक्यातील एका अध्यात्मिक कुटुंबात जन्मलेल्या मुलाला रक्ताचा कॅन्सर अर्थात ‘ल्युकेमिया’ असल्याचे गेल्यावर्षी निदान झाले. येथील लोटस हॉस्पिटलचे संचालक तथा बोन मॅरो उपचार तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे यांनी सर्वज्ञची...