जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! नाशिक – पाणी हे नैर्सर्गिक संसाधन असून उपलब्ध होणा-या पाण्याचे नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश हा गावातील प्रत्येक घरामध्ये नळ जोडणीव्दारे नियमित, सुरक्षित आणि शाश्वत पाणी उपलब्ध करुन देणे हा असून यासाठी लोकसहभागाव्दारे सर्व घटकांचे सक्षमीकरण करुन काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आज जलजीवन मिशनबाबत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना लीना बनसोड यांनी आजही अनेक भागात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने जलजीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण, पाण्य