नासिक जिल्हा राज्यात पहिला तर देशांत ३४ व्या क्रमांकावर !! नासिकच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान !!! डाँ. नरेश गिते यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे राज्यभरांतून अभिनंदन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

                नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शिर्डी येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ४ घरुकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाची  चावी देण्यात आली. यावेळी १० लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या यामधील नाशिक जिल्ह्याच्याच चार लाभार्थ्याचा समावेश होता. दरम्यान, नाशिक जिल्हा पंतप्रधान आवास योजनेत  २३७५७ घरकुल पूर्ण करून (८२%) राज्यात पहिला तर देशात ३४ व्या क्रमांकावर आहे.

         राज्यात घरकुल योजनेत सर्वाधिक चांगले काम नाशिक जिल्ह्याचे असल्याने शिर्डी येथे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील पाच जिल्ह्यातून ४० हजार लाभार्थी बोलावण्यात आले होते  त्यातील २० हजार लाभार्थी हे नाशिकचे होते.  नगर जिल्ह्याचे १२ हजार, औरंगाबादचे  ४ हजार तर बीड व पुणे येथून दोन हजार लाभार्थी कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले होते.
        नाशिक जिल्ह्यातील त्रंबक तालुक्यातील खंबाळा, अंजेनेरी येथील नंदा गोपीचंद बोंबले, सुरगाणा तालुक्यातील शिवराम महादू वाघमारे, कळवण तालुक्यातील शास्त्रीनगर, अभोणा येथील रत्ना रमेश दुसाने, सिन्नर तालुक्यातील ठाकरवाडी, तासदरा येथील सखुबाई भगवान मेंगाळ या ४ लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.
             घरकुलांच्या बाबत राज्यात सर्वाधिक चांगले काम नासिक जिल्ह्यात झाले, याबद्दल डाँ. नरेश गिते व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।