सर्वात कमी वयांत फिल्म फेअर पुरस्कारप्राप्त, ८०-९० दशकांतील अष्टपैलु अभिनेत्री कोण ? १४ वर्षानंतर मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येत आहे !!! हा यशस्वी "प्रवास" जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा , निश्चितच जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, गुणी अभिनेत्रीचं नक्की स्वागत कराल अशी दिग्दर्शकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे !!!
पद्मिनी कोल्हापुरेंचा समृद्ध प्रवास! १४ वर्षानंतर पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! सर्वाधिक कमी वयात फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरत आपल्या अभिनयाद्वारे सशक्त कारकीर्द घडवणारी मराठी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. ८० – ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत स्टार पदावर विराजमान झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेंचा आजपर्यंतचा प्रवास समृद्ध आणि बहारदार राहिला आहे. इंसाफ का तराजू साठी १९८१ साली सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री तर प्रेम रोग साठी १९८३ साली सर्वोत्कृष्ठ नायिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या सर्वाधिक तरुण अभिनेत्री आहेत. ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून मराठी रसिकांच्या थेट हृदयात स्थान पटकावले. या चित्रपटासाठी त्यांना विविध पुरस्कार तर मिळालेच पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तगड यश मिळाल्याने या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाला मराठी रसिकांची आपलं म्हणत मनापासून दाद मिळाली. आशुतोष गोवारीकर यांच्या महत्वाकांक्षी ‘पानिपत’ या हिंदी व शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिका करीत आहेत. नव्या – अनुभवी मराठी –