पोस्ट्स

महाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशचा शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा ! जाणीव-शेतकऱ्यांप्रती पोलीस बाँईजची, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे समर्थन _________________________________ अकोला :- शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदयार्थी आघाडीने समर्थन दिले आहे. उरळ येथील शेतकरी पुत्र गोपाळ अंबादास पोहरे यांनी 25 ऑक्टोबर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी या आधीही मोबाईल टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. मागच्या वर्षी कपाशी वर आलेल्या बोंडअळीचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा केल्यामुळे आणि शिवाजी महाराज पिक विमा योजनेचे नाव बदलण्यासाठी पोहरे हे आंदोलनाला बसले आहेत.        त्यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार ताले यांनी त्यांना भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले आहे. यावेळी संदिप शेळके, राम निंबकर, विशाल खेळकर, सागर निंबेकर, सागर जामोदे, गौरव उमाळे आणि अतुल ताले यांच्या सह असोसिएशनचे समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्वारा-किरतकार 9665382780

नासिकचे सुनील वाजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील वाजे तर इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत सुनील वाजे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून तर नाशिकच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.           राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ.छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी (मामा) आव्हाड यांनी बाळासाहेब गाढवे यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. तर प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.छगनराव भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सुचविल्याप्रमाणे सुनील वाजे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. वाजे व गाढवे यांच्या नियुक्तीचे राजकीय वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सर्वात कमी वयांत फिल्म फेअर पुरस्कारप्राप्त, ८०-९० दशकांतील अष्टपैलु अभिनेत्री कोण ? १४ वर्षानंतर मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येत आहे !!! हा यशस्वी "प्रवास" जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा , निश्चितच जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, गुणी अभिनेत्रीचं नक्की स्वागत कराल अशी दिग्दर्शकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे !!!

इमेज
पद्मिनी कोल्हापुरेंचा समृद्ध प्रवास! १४ वर्षानंतर पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! सर्वाधिक कमी वयात फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरत आपल्या अभिनयाद्वारे सशक्त कारकीर्द घडवणारी मराठी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. ८० – ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत स्टार पदावर विराजमान झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेंचा आजपर्यंतचा प्रवास समृद्ध आणि बहारदार राहिला आहे.  इंसाफ का तराजू  साठी १९८१ साली सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री तर  प्रेम रोग  साठी १९८३ साली सर्वोत्कृष्ठ नायिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या सर्वाधिक तरुण अभिनेत्री आहेत. ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून मराठी रसिकांच्या थेट हृदयात स्थान पटकावले. या चित्रपटासाठी त्यांना विविध पुरस्कार तर मिळालेच पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तगड यश मिळाल्याने या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाला मराठी रसिकांची आपलं म्हणत मनापासून दाद मिळाली. आशुतोष गोवारीकर यांच्या महत्वाकांक्षी ‘पानिपत’ या हिंदी व शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिका करीत आहेत. नव्या – अनुभवी मराठी –

नासिक जिल्हा राज्यात पहिला तर देशांत ३४ व्या क्रमांकावर !! नासिकच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान !!! डाँ. नरेश गिते यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे राज्यभरांतून अभिनंदन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
                नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शिर्डी येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ४ घरुकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाची  चावी देण्यात आली. यावेळी १० लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या यामधील नाशिक जिल्ह्याच्याच चार लाभार्थ्याचा समावेश होता. दरम्यान, नाशिक जिल्हा पंतप्रधान आवास योजनेत  २३७५७ घरकुल पूर्ण करून (८२%) राज्यात पहिला तर देशात ३४ व्या क्रमांकावर आहे.          राज्यात घरकुल योजनेत सर्वाधिक चांगले काम नाशिक जिल्ह्याचे असल्याने शिर्डी येथे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील पाच जिल्ह्यातून ४० हजार लाभार्थी बोलावण्यात आले होते  त्यातील २० हजार लाभार्थी हे नाशिकचे होते.  नगर जिल्ह्याचे १२ हजार, औरंगाबादचे  ४ हजार तर बीड व पुणे येथून दोन हजार लाभार्थी कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले होते.         नाशिक जिल्ह्यातील त्रंबक तालुक्यातील खंबाळा, अंजेनेरी येथील नंदा गोपीचंद बोंबले, सुरगाणा तालुक्यातील शिवराम महादू वाघमारे, कळवण तालुक्यातील शास्त्रीनगर, अभोणा

२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
देशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प :पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी, दि. 19:- देशातील बेघरांना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरांची मुलभूत सोईसुविधांसह निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.             शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे वितरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,  खासदार रावसाहेब दानवे, दिलीप गांधी, सदाशिव लोखं

केंद्र शासनाची महाराष्ट्राला मोठी मदत !!! विश्वास::-२०१ तहसील क्षेत्रात निसर्गाची अवक्रुपा झाल्याने निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्रशासन मदत करेल !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
केंद्र शासनाच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राला मोठी मदत- मुख्यमंत्री             केंद्र शासन नेहमीच महाराष्ट्राला विविध योजना आणि प्रकल्पांसाठी मदत करीत असते.यावर्षी निसर्गाची अवकृपा झाल्याने 201 तहसीलमध्ये पाऊस कमी झाला आहे. अशावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र शासन मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.             उत्पादन मूल्यावर आधारित दीडपट भाव देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. शेतकऱ्यांसाठी स्वयंपूर्णता आणण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. त्या योजनांची अंमलबजावणी राज्यात चांगल्या प्रकारे व्हावी, असे काम सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या परिस्थितीत  केंद्र शासन मदतीचा हात देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.             अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. कुकडी आणि निळवंडे धरणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येतील. नगर शहरातील उड्डाणपुला साठीही 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.             ते म्हणाले, गरीबांसाठी काम करण्याची प्रेरणा शिर्डी येथून मिळते. स्वातंत्र्याची 75 वर्षे

पंतप्रधान मोदींनी मराठीत संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी साधला मराठीतून संवाद शिर्डी, दि. 19 : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील अडीच लाख लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आजदुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे झाला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. श्री. मोदी यांनी बहुतांश वेळ मराठीतून लाभार्थ्यांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. तसेच पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरवात आणि समारोपही मराठीतून केला. ‘हे श्री साईबाबांच्या समाधीचे शताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला याचा मला अतिशय आनंद होत आहे' अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. तसेच आवास योजनेच्या  लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला.  ई- गृहप्रवेश सोहळ्याची सुरवात झाली ती नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी झालेल्या संवादाने. तेथील सिंगा वसावे या लाभार्थ्याने योजनेचा लाभ कसा मिळत गेला या विषयी सांगण्यास सुरवात केली. ‘नवीन घर मिळाले,आता तुम्ही प्रसन्न आहेत का? नवीन घर मिळाल्यामुळे मिठाई खाल्ली का?’असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी सिंगा वसाव