पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

इमेज
ख्यातनाम कवयित्री फरझाना इकबाल यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेला गायक रमेश गुजर यांनी दिलेली चाल आणि त्यांच्याच सुमधुर आवाजात गायिलेल्या कवितेच्या ओळींनी विठ्ठल प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. सध्या पंढरीच्या वारीची लगबग सुरू आहे. वारक-यांचे अनेक विडीओ बघून मन प्रसन्न होते. मात्र या कवितेने विठ्ठल वारी साहित्यात नवीन भर टाकली आहे असे कवयित्री फरझाना इकबाल यांनी सांगितले. गायक रमेश गुजर यांचे आभार मानत विठ्ठल चरणी आपली सेवा रूजू झाली अशा भावना व्यक्त केल्या.  सर्वांनी सदर रचना एकदा ऐकायला हवी !

'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !

इमेज
'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !             नाशिक( प्रतिनिधी ) प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेल्या ' श्री दत्त महात्म्य ' या ग्रंथाचा आजच्या सुलभ मराठीत भावानुवाद असलेला निरुपणकार पद्माकर देशपांडे यांचा 'श्री दत्त महात्म्य कथामृत ' हा ग्रंथ आषाढ शुद्ध प्रतिपदा टेंबे स्वामी यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग  येथील दत्त मंदिरात लोकार्पण करण्यात आला. मुंबईच्या प्रसिद्ध नवचैतन्य आणि हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.  या सोहळ्यास प. प. दंडी स्वामी वल्लभानंद महाराज, दंडी स्वामी वामनानंद महाराज, दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुभाष भिसे, दीपक साधले, ट्रस्टी गुरुनाथ गाणपत्ये, परमपूजनीय विमल भाई, वैभव पेंढारकर, नाशिकच्या श्री दत्त सेवा समितीचे संस्थापक प्रभाकर पाठक,  समितीचे अध्यक्ष व नाशिकच्या गणेश बाबा देवस्थानचे विश्वस्त विवेक महाराज दंडवते, माणगाव देवस्थानचे व्यवस्थापक शिवराम काणेकर, अनिल राज कवीश्वर आदींसह राज्यभरातून आलेले वासुदेवानंद सरस्वती यांचे परंपरेतील भाविक अनुयाय

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

इमेज
महाराष्ट्राला  ‘ मार्वल ’  च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..                आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता  ‘ मार्वल ’  कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे.          मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो.                 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठ

अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

इमेज
अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ! नाशिक::- येथील ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड‌ डिझॅबल्ड या संस्थेच्या वतीने डॉ. हेलेन केलर यांच्या जयंती निमित्त २७ जुन २०२४ रोजी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ व एम.एस.एल. ड्राइवलाइन सिस्टीम कंपनीचे पर्सनल मॅनेजर हेमंत राख उपस्थित होते. दोन्ही पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतली व आपण देखील संस्थेला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले इतर मान्यवर पिंपळगाव कृषी उत्पन्न समिती चे अध्यक्ष पाटील व विंचूरहून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अशोक लोळगे व परिवार यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, नीमिता शेजवळ आदी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थ