काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर !
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर ! नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे. समवेत उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ऍड. संदीप गुळवे. नमस्कार, आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या प्रिंटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत आपणा सर्व मान्यवरांचे मी मविप्र परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बडोदानरेश सयाजीराव गायकवाड महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंद