सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !
         नासिक::- किरण रंगनाथ दराडे, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक, व सचिन प्रभाकर पाटील, कनिष्ठ सहाय्यक, (लेखा )वित्त विभाग, जिल्हा परिषद, नाशिक
यांना ११०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

              यातील तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण १८ सेवा पुस्तके लोकसेवक किरण दराडे यांच्याकडे जमा केली होते. सदर १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून  वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७००/-रुपये याप्रमाणे १८ सेवा पुस्तकांचे १२६००/- रुपयांची मागणी करून,  तडजोडीअंती  ११०००/- रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक किरण दराडे यांच्या सांगण्यावरून लोकसेवक सचिन पाटील यांनी सदरची रक्कम लाचेची आहे हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
       सदर कारवाई चे सापळा अधिकारी श्रीमती मीरा वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. हवा.पंकज पळशीकर, पो.हवा.प्रमोद चव्हाणके, पो.हवा. संदिप वणवे यांनी मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. 
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. कारवाई साठी सहकार्य स्वप्नील राजपूत, वाचक, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, नासिक.यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!