पोस्ट्स

हिमांशू राय, भैय्युजी महाराज यांच्या आत्महत्या आणी नासिक शहरांतील गेल्या सहा महिन्यातील आत्महत्या !!! धकाधकीच्या जीवनांत थोडा वेळ काढून विचार करायला हवा !! आज लिंक वर क्लिक करा म्हणणार नाही,,,,,पण. सामाजिक दायित्वापोटी लिंक शेअर करा, कमेंट मध्ये अभिप्राय नोंदवा !!

इमेज
आत्महत्यांचे शहर म्हणून नासिक बदनाम व्हायला लागले आहे, की इतर ठिकाणांचीही अशीच परिस्थिती आहे ? जगांत आत्महत्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, फास घेणे, जलसमाधी घेणे, उडी घेणे, औषध घेणे, अग्निकाष्ठ घेणे, व अलीकडच्या काळात वाहनाखाली उडी मारून, बंदुकीची गोळी झाडून घेणे इ.           मात्र जीवन संपविणे हे निषेधार्हच मानायला हवे,  पुरातन काळापासुन आत्महत्या करणे याबाबत मतमतांतरे आहेत, काही धर्म समर्थन करतात तर काही धर्म निषेधात्मक पवित्रा घेतात, मुसलमान निषिद्ध मानतात त्यामुळे जगांत सर्वात कमी प्रमाण (अगदीच नगण्य) आढळून येते, त्याखालोखाल बौद्ध धर्मिंयामध्ये ही "अहिंसा परमोधर्म" या तत्वानुसारच्या शिकवणुकीमुळे प्रमाण कमी आहे, मात्र इतर धर्मिंयांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळून येते.(हिंदू व ख्रिश्चनांमधील काही गटांत अधिक प्रमाण जागतिक पातळीवर नोंदविले गेले आहे, )           काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी हिमांशु राय व राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांनी केलेला देहत्याग....... (आत्महत्या म्हणण्याचे धाडस होत नाही पण समर्थन ही करत नाही).         एक पोलीस प्रशासनातील कायद्याचं ज्ञान असलेल्

सरपंचासह सदस्यांना कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी सध्याच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले - ग्रामविकास राज्यमंत्र्यांचे न्यायालयातील सादर अपील अमान्य !! यापुर्वीच ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले आहे !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
          नाशिक(२)::-सोमपूर (ता. बागलाण) ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी होऊन त्यात दोषी ठरविण्यात आलेले सरपंच व सदस्य यांचे अपील अमान्य करण्यात आले असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ३९ (१) नुसार ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व सदस्यांना सध्याच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत नुकतीच ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.           सन २०१६ मध्ये बागलाण तालुक्यातील सोमपूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत प्राथमिक चौकशीनंतर विभागीय चौकशीची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून घेवून सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देवून अहवाल सादर केला होता. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५७ अन्वये प्राप्त होणारा ग्रामनिध

दातली येथील रिंगण सोहळा २५००० च्या उपस्थितीत उत्साहात पार पडला !! विठ्ठल भक्तीचा अपूर्व व डोळ्याचे पारणे फेडणारा उत्सव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पायी दिंडी प्रसिद्धी प्रमुख दीपक भावसार यांजकडून,,,,,,,,,         सिन्नर(२)::-संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली येथें अपूर्व उत्साह आणि निवृत्तीनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या जयघोषात पार पडले.       काल दातली ता.सिन्नर येथे मुक्कामी आलेली निव्रुत्तीनाथ पायी दिंडीचे आज रिंगण सोहळ्याचे सालाबादाप्रमाणे आयोजन असते, आज झालेल्या रिंगण सोहळ्यासाठी 25 हजारापेक्षा जास्त वारकरी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.         मानाच्या अश्वाकडून विठ्ठल नामाच्या जयघोषांत डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा उत्साहात पार पडला यांवेळी निव्रुत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष हभप संजय नाना धोंडगे, दिंडी अध्यक्ष हभप पंडीत महाराज कोल्हे, पालखीचे मानकरी बेलापूरकर, मानकरी जयंत गोसावी, एकनाथ महाराज गोळेसर, भगीरथ महाराद काळे, माधवदास राठी, श्रीपाद कुलकर्णी, शरद महाराज खालकर, संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त आदी उपस्थित होते.

"परफ्युम" चं टिजर पोस्टर सोशल मिडीयाद्वारे लाँच !! या चित्रपटातून तरूणांच्या मानसिकतेचे पदर उलगडणार काय ? एक ऊत्सुकता सर्वांना,,,,,,,!! दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी !! खालील लिंकवर क्लिक करा व वाचा सविस्तर !!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] ' परफ्युम'चं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच              परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच हे पोस्टरही व्हायब्रंट आहे.               सायकलवर बसून एकमेकांच्या हातात हात असलेलं कपल या पोस्टरमध्ये दिसत आहे. रंगांची मुक्त उधळण असलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची कथा ही विविधरंगी आहे, हे व्यक्त होतं. त्यामुळे प्रेमाचे, नात्यांचे, तरुणाईच्या मानसिकतेचे पदर उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.                  “हलाल”सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी “लेथ जोशी” चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच “परफ्युम”ची प्रस्तुती केली आहे तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे              दिग्दर्शक आण

"गोट्या" खेळून आपण फक्त मारच खाल्ला असेल ना ? पण नासिकच्या केतनभाई सोमय्यांचा "गोट्या" आँलिंपिक ट्राफी जिंकुन आणतो का ? , !! सविस्तर ६ जुलैला बघण्यासाठी दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठीचा रिपोर्ट आजच बघण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी  ] ‘ गोटया ’   चा खेळ ६ जुलैला रंगणार चित्रपटगृहात            खेळातली रंजकता, खेळाडूच्या आयुष्यातील संघर्षाचे प्रतिबिंब आजवर अनेक चित्रपटांतून उमटले आहे. बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत.  हुतूतू’, ‘लपंडाव’, ‘आंधळी कोशिंबीर’, विटी दांडू’,लगोरी हे पारंपरिक खेळ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. काही अपवाद वगळता हल्लीची मुले हे खेळ फारसे खेळताना दिसत नाही. आजच्या पिढीला विस्मृतीत गेलेल्या खेळातील गंमत दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे व निर्माते जय केतनभाई सोमैया यांनी ‘ गोटया ’  या आगामी मराठी चित्रपटातून केला आहे. येत्या ६ जुलैला  गोट्यांचा खेळ चित्रपटगृहात रंगणार आहे. आरोग्य टिकवायचे असेल निसर्गाशी समतोल राखणारे मातीतले खेळ खेळणे गरजेचे आहे. जीवनात खेळाचं महत्त्वउरलेलं नसल्याचं विदारक चित्र सध्या दिसतंआहे. या पार्श्वभूमीवर येणारा ‘ गोटया ’  हा चित्रपट क्रीडासंस्कृती टिकविण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे.        खेळातून अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू शकतो हे दाखवतानाच गोटयांची आवड असणाऱ्या‘ गोटया ’

जिल्ह्यातील एकही मुल कुपोषित व ग्राम बाल विकास केंद्रातील आहार तसेच उपचारापासुन वंचित राहणार नाही-अनिल लांडगे. सहाय्यक प्रशासनाधिकाऱ्यास सेवानिव्रुत्तीच्या दिवशीच निव्रुत्तीवेतन दाखला सुपूर्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
           नाशिक(३०)::- जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यात जोरदार काम सुरु केले आहे. महिला व बालविकास. आरोग्य व ग्रामपंचायत विभाग यासाठी एकत्रितपणे काम करीत आहेत. जिल्ह्यातील एकही मुल कुपोषित राहणार नाही व ग्राम बाल विकास केंद्रातून आहार व उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे व आवश्यक तेथे गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करून कुपोषित बालक शोधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले.            नाशिक व दिंडोरी तालुक्याची एकत्रित आढावा बैठक आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सभागृहात  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.           यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ डेकाटे , सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बाल विकास विभागाचे उप मुख्य कार

कोण म्हणते, मराठा जातीयवादी आहे !! थोडक्यांत मांडलेल्या विचारांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कोण म्हणते , मराठा जातीयवादी आहे, विचारून तर बघा एकदा नवनिर्वाचित आमदार दराडे बंधूंना, व शिवसेनेला ! किती मते होती वंजारी समाजाची, याचा अभ्यास करा ? पैसे जे, निवडणुकीत वाटले जायला नकोत या मताचा मी पण आहे, पण कोणी एकानेच वाटलेत की अनेक उमेदवारांनी ? मग फक्त दराडे व विकले गेलेले मराठाच दोषी आहेत का ? बोटावर मोजण्या इतकी वंजारी समाजाची मते असतांना मराठा समाजाने दरांडेंना मतदान केले व दोन्ही बंधू निवडून आलेत यां विजयांतील सर्वात मोठा वाटा मराठा समाजाचा आहे, हे कुणीही नाकारू शकत नसतांना विनाकारण मराठा समाज जातीयवादी आहे अशी बदनामी का होतेय ?  हाकाटी पिटविणाऱ्यांनो जर खरोखर मराठा समाज जातीयवादी असता वा तसा वागला असता तर निवडणुकीचा निकाल काय असता ? याचा विचार करा !! सकल मराठा समाज एक आहे पण जातीयवादी राजकारणापासुन कोसो दूर आहे नासिक  मतदार संघातील दोन्ही विधानपरिषद निवडणुक निकालावरून स्पष्ट होत असतांना विनाकारण बदनामी का केली जातेय ? या मागील षडयंत्राचा  अभ्यास करणे हा यामागील मुळ मुद्दा ठरू शकतो , त्याचा अभ्यास ज्यांना गरज आहे ते करतीलही, तुर्तास जातीयवादाला पसरवू नका, फक्त नासिक जिल्ह