हिमांशू राय, भैय्युजी महाराज यांच्या आत्महत्या आणी नासिक शहरांतील गेल्या सहा महिन्यातील आत्महत्या !!! धकाधकीच्या जीवनांत थोडा वेळ काढून विचार करायला हवा !! आज लिंक वर क्लिक करा म्हणणार नाही,,,,,पण. सामाजिक दायित्वापोटी लिंक शेअर करा, कमेंट मध्ये अभिप्राय नोंदवा !!

आत्महत्यांचे शहर म्हणून नासिक बदनाम व्हायला लागले आहे, की इतर ठिकाणांचीही अशीच परिस्थिती आहे ?
जगांत आत्महत्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, फास घेणे, जलसमाधी घेणे, उडी घेणे, औषध घेणे, अग्निकाष्ठ घेणे, व अलीकडच्या काळात वाहनाखाली उडी मारून, बंदुकीची गोळी झाडून घेणे इ.
          मात्र जीवन संपविणे हे निषेधार्हच मानायला हवे,  पुरातन काळापासुन आत्महत्या करणे याबाबत मतमतांतरे आहेत, काही धर्म समर्थन करतात तर काही धर्म निषेधात्मक पवित्रा घेतात, मुसलमान निषिद्ध मानतात त्यामुळे जगांत सर्वात कमी प्रमाण (अगदीच नगण्य) आढळून येते, त्याखालोखाल बौद्ध धर्मिंयामध्ये ही "अहिंसा परमोधर्म" या तत्वानुसारच्या शिकवणुकीमुळे प्रमाण कमी आहे, मात्र इतर धर्मिंयांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळून येते.(हिंदू व ख्रिश्चनांमधील काही गटांत अधिक प्रमाण जागतिक पातळीवर नोंदविले गेले आहे, )
          काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी हिमांशु राय व राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांनी केलेला देहत्याग....... (आत्महत्या म्हणण्याचे धाडस होत नाही पण समर्थन ही करत नाही).
        एक पोलीस प्रशासनातील कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीने जीवनयात्रा संपविणे ही समाजासाठी केलेले बलीदान समजावे काय ?  असा प्रश्न कुण्या विचारवंताने मांडला नाही याचे आश्चर्य वाटते,  जर कायद्याने स्वेच्छामरणाची परवानगी मिळू शकत नाही व असाध्य रोगामुळे (हे कारण सांगीतले जाते) जीवन जगणे असह्य होत असतांना व कालपरवा पर्यंतचे कणखर व्यक्तीमत्व अशी प्रतिमा निर्माण केलेल्या आत्म्यांस नक्कीच मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात ठेच पोहचली असेल व कायदा आड येतेाय असे वाटले असल्यास केलेले क्रुत्य नक्की आत्महत्या असावी काय ?
         राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांच्याबाबतीत तपासाअंती कारण बाहेर येईल वा येणार नाही, पण मानसशास्रानुसार व पुरातन आडाख्यांनुसार अत्युच्च शिखरावर(पैसा, ज्ञान, मान-मरातब यांसारखे) पोहचलेल्या व्यक्तीही जीवनयात्रा संपवितात असे पुर्वापार घडलेल्या घटनांवर नजर टाकल्यास दिसुन येते मग भैय्युजी महाराज यांची आत्महत्या म्हणावी काय ?
         या दोन घटना नासिक शहरांतील गेल्या सहा महिन्यातील आत्महत्यांशी जोडता येणार नाहीत परंतु असामान्य व सामान्य हा फरक मांडला गेला तरच घटनेचे गांभीर्य लक्षात येते हा नियम आहे,
      याआधी जगांतील आत्महत्या करणाऱ्यांचे वयही बघायला हवे असे मला वाटते, शून्य ते पांच या वयांत कुणीही नाही, सहा ते दहा मध्ये क्वचित, अकरा ते वीस दरम्यान एकवीस ते पस्तीस पेक्षा जास्त व पुढेही तेव्हढेच प्रमाण दिसते, 
         नासिक शहरांतील सहा महिन्यातील १७५ पैकी १३०/१३५(अंदाजे) आत्महत्याग्रस्त हे अकरा ते तीस या वयोगटांतील आहेत असे दैनिकांमधील बातम्यांवरून दिसते, येथे तंतोतंत आकडेवारीएेवजी घटनेचे गांभीर्य महत्वाचे आहे असे मला वाटते.
          काय करतोय समाज ? कसले ज्ञान देत आहेत पालक-शिक्षक ? कुठे आहेत प्रबोधन करणाऱ्या सामाजिक संस्था व समाजसेवक ? (राग नसावा,आमच्यासहीत)
           आज भारतीय कायद्यानुसार जर गुन्हा आहे तर तो मानायलाच हवा, पण अशा गुन्हेगारांना म्रुत्युपश्चातही शिक्षा का देण्यात येऊ नये ? शिक्षा कुणालाही होवो पण शिक्षेचा धाक हा सर्वांनाच असतो म्हणून गुन्ह्यांचे प्रमाणतरी कमी होईल ! म्रुत्युनंतरही केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा जगांतील काही देशांमध्ये दिली जाते तशी आत्महत्येच्या गुन्हेगाराला दिली व तत्संबधी बातमी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केल्यास समाजाचे वा प्रशासनाचे नुकसान नाही मात्र थोडाफार फायदा होईल असे वाटते !
        "आयुष्य आव्हानाची दुसरी बाजू आहे" ज्याच्यात आव्हान पेलण्याची ताकद आहे तो कधीच असा मार्ग अवलंबणार नाही,
       "जीवनांत जगणे आहे व ते यथेच्छ जगावे"     अशा सकारात्मक विचारांची पेरणी केली व प्रत्येकाला जे जे योग्य वाटेल असे सकारात्मक प्रबोधन केल्यास एकही नामर्द जगांत शिल्लक राहणार नाही, सगळेच मर्द असतील व जीवनाचा आनंद उपभोगण्यात मश्गुल असतील.
हा पत्रप्रपंच नासिक शहरापुरता मर्यादित नसुन सर्व गांवखेडे, शहरांचा आहे, नासिक हे उदाहरण म्हणून घेतले आहे जेथे सहा महिन्यातील घटनांनी मनांत कालवाकालव झाली ती शब्दरूपाने व प्रबोधनात्मक मांडण्याचा प्रयत्न करीत होतो त्याचदरम्यान दिल्लीतील अकरा व्यक्तींच्या ????? घटनेच्या बातमीने पुन्हा एक "ब्रेक" दिला...........
    ओम शांती

सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून लिंक फाँरवर्ड करा व आपला अभिप्राय, सुचनांसहीत लिंकच्या खालील कमेंट मध्ये नोंदवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!