मकरंद-क्रांती यांची "ट्रकभर स्वप्न" २४ आँगस्टला आपल्यासमोर येत आहेत ! शोधूया, ट्रकभर स्वप्नांमध्ये आपली स्वप्ने आहेत का ? दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी !!!
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] मकरंद-क्रांतीच्या‘ट्रकभर स्वप्नां’चाप्रवास प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन सिनेमांच्या शोधात असणारे मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकारही ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. मकरंद-क्रांती यांनी या जोडप्याची भूमिका साकारली आहे. मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता... अॅक्टर-डिरेक्टर अशी प्रतिमा असलेल्या मकरंदने मराठी-हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. आता ‘ट्रकभर स्वप्न’ या मराठी सिनेमाचाही समावेश झाला आहे. पण या सिनेमातील मकरंदची भूमिका आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी विरुध्द आहे. मकरंद