मुख्यमंत्र्यांना महापुजेपासुन रोखण्यासाठी नासिकमधून हजारोच्या संख्येने तरूण पंढरपूरला जाणार-सकल मराठा समाज,नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाआरती पूजनापासून रोखण्यासाठी नाशिक मधून हजारो संख्येने तरुण       नासिक(१९)::-आषाढि एकादशी निमित्तानं पंढरपूरात राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महाआरती पूजनाचा मान दिला जातो.अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहेत. परंतू या वर्षी महाआरती पूजनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून देणार नाही असे मराठा क्रांती मोर्चाने भूमिका घेतली आहेत. आणि या भूमिकेवर ठाम राहून मुख्यमंत्री यांना रोखण्यासाठी इतर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातून देखील मोठया संख्येने मराठा समाज पंढरपुराला जाणार आहेत.

            मराठा समाजाचे अनेक मुलभूत प्रश्न सुटावेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह इतर देखील राज्यात मराठयांचे लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे निघाले होते. तब्बल ५८ महामोर्चे काढण्यात आले होते. त्या मोर्चात प्रामुख्यानं मराठा आरक्षण, शेतकरण्याच्या मालाला हमीभाव, मराठा समाजातील विध्यार्थीना वस्तीगृह, स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करून तरुणांना रोजगार, मराठा समाजातील मुलांना फी सवलत, गुणवतेच्या आधारावर पदोउन्नती, अरबी समुद्रातील शिवसम्राक असे विविध प्रश्न,समस्या राज्यशासनाच्या समोर मांडले परंतु या सर्व प्रश्नावर ठोस कुठलाही निर्णय राज्य शासनाने घेतलला नाही.

             राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाकाळात एकसुद्धा बैठक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांना बोलून घेतलेली नाही. त्यांचे प्रश्न जाणून घेतले नाही. राज्यशासने एक उपसमिती त्यावर पाच केबिनेट मंत्र्यांची नियुक्ती करून समिती नेमली. ही समिती पूर्णपणे फसवणूक करण्यासाठी,दिशाभूल करण्यासाठी आणि फक्त आश्वासन देण्याकरता कामी आली. या समितीने एकसुद्धा निर्णय घेतला नाही. या मुळे पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आहेत. 

           मराठा समाजाला आपले हक्क, आपले अधिकार मिळविण्याकर्ता मूक पर्व सुरवात केली होती. हक्क काही मिळाले नाही. म्हणून आता ठोक मोर्चाला सुरवात झाली आहेत. ठोक मोर्चातून महाराष्ट्र पेटणार आहे. त्यातून जे परिणाम होतील. त्याला सर्वस्व राज्याचे मुख्यमंत्री व राज्य शासन जबाबदार असणार आहेत.

          महाराष्ट्रात मराठा समाजा बरोबर इतर देखील समाज अडचणीत आहेत. शेतीमालाला भाव नाही आत्महत्या वाढत आहेत. दुधाला भाव नाही शेतकऱयांना दूध रस्त्यावर फेकून आंदोलन करण्याची वेळ आली. जातीय तेढ निर्माण करणारी वातावरण उभं केलं जातं आहे. महिला सुरक्षित नाही. राज्य शासनाकडून कुठलाही विकास राज्याचा करता आलेला नाही. सर्व त्रस्त आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तात्काळ बदलावा व कार्यक्षम तथा निर्णायक्षम मुख्यमंत्री या महाराष्ट्राला द्यावा ही देखील प्रामुख्यानं मागणी. 

           सकल मराठा समाज नाशिक शहर / जिल्हा.
          मराठा क्रांती मोर्चा, नाशिक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!