पोस्ट्स

शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांच्याकडून जनतेस सद्वविवेकपणे मतदान करण्याचे आवाहन ! कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठिंब्याचा प्रश्न नाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शहर-ए-खतीब यांच्याकडून जनतेस आवाहन ! नासिक ::- शहर-ए-खतीब हे मुस्लीम समुदायाचे सेवक म्हणून कार्य करीत असतात, त्यामुळे राजकीय निवडणुकीत या पदाचा काहीएक संबध  नसतो, त्याचप्रमाने आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासोबत  कधीच नव्हतो, आजही नाही, आणी भविष्यातही राहणार नाही, आम्ही फक्त आणी फक्त समाजाचे सेवक या नात्याने कार्यरत असतो, मात्र सध्या होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधील निवडणुकीसाठी असलेले बहुतेक उमेदवार आमच्या सदीच्छा व आशिर्वादपर भेटीसाठी येतात याचा अर्थ आम्ही एखाद्या राजकीय पक्षासोबत आहोत असे समजणे गैर आहे. भेटीचा विषय कुण्या राजकीय पक्षाबरोबर वा राजकीय व्यक्तीसोबत जोडून जनतेत चुकीचा संदेश पाठविला जात असेल तर अशा अफवांना समाजाने बळी पडू नये, लक्ष देऊ नये, आपल्या लोकशाही मुल्यांचा हक्क अबाधित ठेऊन सद्विवेक बुद्धीने अंतरात्म्याचा आवाज सांगेल त्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा,  भारतीय नागरिक आहोत तर महत्वपूर्ण तथा गंभीरतेने मतदानाचे कार्य प्रत्येकाने पूर्ण करावे, असे आवाहन नासिक शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांनी एका पत्रकाद्वारे

माझ्याविषयी कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्येधाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
माझ्याविषयी  कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्ये धाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ नाशिक, दि.२३ एप्रिल :- माझ्यावर आणि समीर भुजबळ वर केलेले आरोप सर्व खोटे असुन त्याबाबतचा तसा अहवाल न्यायालयाकडुन तर येईल. मग त्यानंतर मात्र माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झालेल्या जाहीर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.          ते पुढे म्हणाले की,  प्रत्येकजण स्वत:ला विकासपुरुष, कार्यसम्राट म्हणून घेत असतांना सिन्नर तालुक्यात १० वर्षे आमदारकी काळात तुम्ही  स्वतः काय विकास केला असा सवाल करत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल तर  तो फक्त मी आणि  समीर भुजबळ यांच्या निधीतुन विकास केला आहे असे सांगत एक बस स्टँड बांधुन त्याचे गाळे भाड्याने देऊन किंवा विकुन आपली दुकानदारी केलेली नाही. सिन्नरच्या विकासासाठी समीर भुजबळ यांनी निधी उपलब्ध करुन दिला  आहे.  त्यामुळे कुणीही खोटे बोलु नये असे सांगून कोकाटेवर चांगलेच  तोंडसुख घेतले.            पिंपळगांव येथे झालेल्या प

नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग नाशिक,दि.२३ एप्रिल :- राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ  यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड विभागात काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शकडो महिला व तरुण आपल्या  मोटार सायकल घेऊन रॅलीमध्ये सहभागी होत समीर भुजबळ यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन करत होते. त्याअगोदर समीर भुजबळ यांनी सकाळी संभाजी स्टेडीयम  सिडको येथील मॉर्निग वॉक साठी आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.         आज सकाळी नाशिकरोड येथील बिटको चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे जेलरोड, भीम नगर, गारगोटी बंगला,  कॅनॉल रोड,  पवारवाडी,  भगवती लॉन्स,  पंचक गाव, राजराजेश्वरी चौक,  ढिकले मळा,  शिवाजी नगर,  निरगुडे हॉस्पिटल, सैलानी बाबा,  दसक,  सैलानी बाबा, मारुती मंदिरा जवळून उपनगर नाका,  कॅनॉल रोड टाकीवर,  सिन्नर फाटा,  विष्णू नगर, तसेच  एकलहरा रोड,  गोरेवाडी,  ट्रॅक्शन कॉलनी रोड,  पॉलीटेक्निक रोड,  सिन्नर फाटा, चेहड

सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठीसमीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ नाशिक,दि.२३ एप्रिल :- सिन्नर तालुक्यातील बहुतांश गावातील मुख्य पाण्याची आणि शेती समस्या आहे. आगामी काळात सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी  केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून आणा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील वावी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.        यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,  सिन्नर तालुक्याचे सतत दहा वर्षे आमदार म्हणून काम करणार्याह कोकाटेंनी त्यांच्या दहा वर्षांत सिन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्यायच केला असून अशा अन्यायकारक आणि नाकर्तेपणाची भुमिका घेणा-या कोकाटेना सिन्नरकरांचा आता काय अचानक पुळका आल्याचे सांगत यावेळी कोकाटेना सिन्नरकर नाकारल्या शिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी  सांगीतले.            यावेळी डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासारखे कर्तबगार नेतृत्व आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रातही सापडणार नाही समीर भुजबळ यांच्याकडे प्रगत

उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक येथे सभा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज नाशिक येथे सभा नाशिकः  नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. २४ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व भाजपाचे स्टार प्रचारक तथा उत्तराखंडचे पर्यटन विकास मंत्री सतपालजी महाराज यांची सभा शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सभेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. या सभेत उद्धव ठाकरे आणि सतपालजी महाराज काय मार्गदर्शन करतात याकडे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.        यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन,शिवसेना उपनेते बबनराव घोलप, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, भाजपाचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर रंजनाताई भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतलताई सांगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रासपाचे जिल्हाध्यक्ष अरुण आव

गोडसेंचा एकलहरे गटात झंझावाती प्रचार दौरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसेंचा एकलहरे गटात झंझावाती प्रचार दौरा ! नाशिकः महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काल शिवसेना उपनेते बबनराव घोलप, आ. योगेश घोलप, जि.प. सदस्य शंकरराव धनवटे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के आदींच्या नेतृत्वाखाली एकलहरे गटात झंझावाती दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात एकलहरे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौऱ्यात सहभागी झालेल्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान करुन टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ग्रामीण भागातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. सकाळी एकलहरे येथून सुरुवात झालेल्या या प्रचार दौऱ्यात सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, मोहगाव, बाभळेश्वर, बेलतगव्हाण, संसरी, शेवगे दारणा, नानेगाव, दोनवाडे, राहुरी, लहवित , लोहशिंगवे, वंजारवाडी आदी गावांमध्ये प्रचार करताना घोलप यांनी गत पाच वर्षातील गोडसेंच्या कामाचा आलेख सादर करत भागाच्या विकासासाठी युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अजिंक्य गोडसे, पं.स. सदस्य अनिल जगताप, डॉ. मंगेश सोनवणे, शाखाप्रमुख शांताराम राजोळे, मधुशेठ कापसे, योगेश म्हस्के, सचि

गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिला विजयाच्या शुभेच्छांसह आशिर्वाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिल्या विजयाच्या शुभेच्छा !           नाशिक- लोकसभा निवडणुकीतील प्रचारात चांगलीच रंगत वाढली असून शिवसेना-भाजप व रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना विविध स्तरातून वाढणाऱ्या पाठिंब्यामुळे विरोधकांची डोकेदुःखी वाढू लागली आहे. मंगळवारी सकाळी येथील बोहरी व वाल्मिकी समाजातील मान्यवरांच्या गोडसे यांनी भेटी घेतल्या. यापूर्वी विविध समाज-संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समाजाच्या नेत्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला.          येथील बोहरी समाज संघटनेच्या बारुल इमारत येथे गोडसे यांना विजयीभवच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उमेदवार गोडसे यांना समाजाचे धर्मगुरु मुस्ताली भाईसाहेब यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वस्तरातून गोडसे यांना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या निवडणुकीत आपले पारडे जड ठरेल असा विश्वास समाजाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार देवयानी फरांदे, प्रथमेश विसे, चंद्रकांत