सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठीसमीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी
समीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ
नाशिक,दि.२३ एप्रिल :- सिन्नर तालुक्यातील बहुतांश गावातील मुख्य पाण्याची आणि शेती समस्या आहे. आगामी काळात सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी  केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून आणा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील वावी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
       यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,  सिन्नर तालुक्याचे सतत दहा वर्षे आमदार म्हणून काम करणार्याह कोकाटेंनी त्यांच्या दहा वर्षांत सिन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्यायच केला असून अशा अन्यायकारक आणि नाकर्तेपणाची भुमिका घेणा-या कोकाटेना सिन्नरकरांचा आता काय अचानक पुळका आल्याचे सांगत यावेळी कोकाटेना सिन्नरकर नाकारल्या शिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी  सांगीतले.
           यावेळी डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासारखे कर्तबगार नेतृत्व आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रातही सापडणार नाही समीर भुजबळ यांच्याकडे प्रगतीचे व्हीजन आहे छगन भुजबळ यांच्याकडे विकास कसा करुन घ्यायचा त्यासाठी लागणारा निधी कसा उपलब्ध करता येईल याची माहिती असल्याने  २००९ ते २०१४ या कालावधीत नाशिकचा चेहरामोहराच बदलुन टाकला. मात्र काही कर्मदरिद्री लोकप्रतिनिधींमुळे त्यानंतर नाशिकचा विकासच खुंटला असुन आगामी काळात नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भुजबळ यांच्यावर विश्वास टाकुन मतदान करा आणि निवडुन आणा असे आवाहन आमदार सुधीर तांबे यांनी केले.
          आदीवासीच्या नावावर मत मागुन फसविणा-यांना आता जनता बिलकुलही थारा देणार नसुन आदिवासींच्या विकासासाठी समीर भुजबळ यांना निवडुन देण्याचे आवाहन आमदार वैभव पिचड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ! आषाढी स्पेशल- कवयित्री प्रतिभा खैरनार यांची "भक्तीची वारी !