वारली चित्रकलेच्या सार्वत्रिक प्रसारासाठी... ( भाग तिसरा). लेखमाला लवकरच ग्रंथरूपाने येणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
वारली चित्रकलेच्या सार्वत्रिक प्रसारासाठी... ( भाग तिसरा) कलावंतांचे दोन प्रकार प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे पारंपरिक ज्ञानाच्या माध्यमातून वारसा जसाच्या तसा पुढे नेणारे; कलेविषयी आदर, श्रद्धा बाळगून तिच्यासाठी अथक कष्ट करणारे. दुसरे आपल्या परंपरागत कलेत स्वतःच्या प्रतिभेने नवनिर्मितीची भर घालणारे; नवनवीन प्रयोग करीत वेगवेगळ्या शक्यता तपासून बघणारे. असे कलावंत कलेमध्ये कालानुरूप परिवर्तन घडवतात. मात्र हे करताना मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही याचीही दक्षता घेतात. गेल्या १६ वर्षांत अभ्यास, संशोधन करताना मला दोन्ही प्रकारचे अनेक आदिवासी कलाकार भेटले. त्यांच्याकडून वारली कलेचे विविध पैलू जाणून घेतले. ते तपासून, चिंतन करून त्यातूनच वारली चित्रशैलीचा प्रचार, प्रसार करता आला. या दीर्घ लेखमालेत ज्येष्ठ तसंच युवा वारली कलाकारांची आणि मी रेखाटलेली चित्रे वापरल्याने लेखांची वाचनीयता व आकर्षकता वाढली.ही लेखमाला ११ शतके वारली कलेची जपणूक करणाऱ्या सर्व कलाकारांना, ही कला प्रकाशात आणणारे भास्कर कुलकर्णी, पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित ! चित्रकार व पत्रकार या नात्याने गे