स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा महेश शिरोरे यांजकडून कळवण(१३)::-पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल . कोणत्याही क्षेत्रात संघटित होऊन काम केल्यावर निश्चित पणे आपल्याला यशस्वी होता येते. बचत गटांमार्फत ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी रोटरी क्लब ने पुढाकार घ्यावा असे सांगितले. रोटरी क्लब ऑफ कळवण तर्फे राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षणक्षेत्रात सेवाभावी समाजाभिमुख कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी दिला जाणारा नेशन बिल्डर टीचर्स अवार्ड या मानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री निलिमा मिश्रा बोलत होत्या. याप्रसंगी श्री गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.जे.डी.पवार, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, विस्ताराधिकारी शितल कोठावदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे, सचिव संभाजी पवार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नयना पगार, सचिव निर्मला संचिती रोटरॅक्ट अध्यक्ष केतकी पगार, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश भामरे यांनी केले तसेच विलास शिरोरे यांनी रोटरी कार्याची माहिती दिली