भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या दोन दिवसीय अभिनव पथ परीषदेचे उद्घाटन !! परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण !!
नाशिक शाखेच्या परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय " अभिनव पथ " प्रादेशिक परिषदचे, उदघाटन नाशिक येथे दि ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे आणि जळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शाखेत करण्यात आले. सदर परिषदेत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे , इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सीए. प्रफुल्ल छाजेड , प्रमुख अतिथी म्हंणून उपस्थित होते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव व धुळे परिसरातील २०० पेक्षा अधिक सनदी लेखापालांनी या परिषदेत भाग घेतला. या परिषदेत सीए. राजेंद्र शेटे लिखित “दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स” या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी सीए. राजेंद्र शेटे यांनी आपले विचार मांडतांना असे सांगितले कि कोणता हि व्यवसायिक फसवणूक करण्यासाठी व्यवसाय सुरु करत नाही, परंतु अशा प्रकार ची परिस्थिती निर्माण होते कि जी त्याला फसवणूक करण्यास भाग पाडते, अशा परिस्थितीलाच आर्थिक गैरव्यवस्थापन असे म्हणतात. सदरच्या पुस्तका मध