पोस्ट्स

छगन भुजबळ यांच्याकडून रेशन दुकानदाराचे कौतुक ! आय एस ओ प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट ! आयएससो नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी ! मुळशी,पुणे,दि.२७ मार्च :-   राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दौऱ्यावर असतांना त्यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पाहणी केली.        यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा ! जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर सन्मानित !

इमेज
राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा ! जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर सन्मानित !       नासिक(प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांना आज जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यकर उपायुक्त, वस्तू व सेवाकर विभाग मुंबई चे संजय पोखरकर, आयमाचे सचिव तथा उद्योजक गोविंद झा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई जयंत गायकवाड, सी.आर.पी.एफ. शहीद शिवराज शंकर चव्हाण यांच्या वीरपत्नी विमल चव्हाण, मा. नगरसेविका श्रीमती वत्सलाताई खैरे, विधानसभा सदस्य अॅड. श्रीमती हुसनबानो खलिफे, जलसंधारण अधिकारी मालेगाव अंकीता वाघमारे, मा. स्थायी सभापती अमोल जाधव, डॉ.अतुल वडगांवकर, अॅड. अनिलराव कासार या मान्यवरांना जाणीव पुरस्कार आज कालिदास कलामंदिर येथे  प्रदान करण्यात आला.        पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यवर सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ स्मिता देशमुख, नासिक मनपा माजी उपमहापौर भिकूताई बागूल, डॉ. स्वप्निल बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे, जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा

कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्व वाढेल ! जिल्ह्याला द्राक्ष राजधानीचा मान !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, (7387333801)  जिल्ह्याला द्राक्ष राजधानीचा मान नाशिक ( प्रतिनिधी ):- कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्व अधिक वाढेल. शेतकऱ्यांचे दर्जेदार उत्पादन वाढून उत्तमभाव मिळेल. नाशिक जिल्हा द्राक्ष राजधानी ठरली आहे असे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले. ते नाशिक द्राक्ष महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर जगदीश होळकर, ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष राकेश बकरे, दत्ता भालेराव, सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर, सोमा वाईनचे अधिकारी पाचपाटील, कृषिविभाग अधीक्षक सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागीय प्रकल्प उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.           द्राक्षपंढरी असा नावलौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाने रंगत आणली आहे. विभागीय उपसंचालक पर्यटन संचालनालय यांच्या मार्फत दोन दिवसांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या गंगापूर धरणाजवळ असलेल्या ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे ही संधी पर्यटकांना उपलब्ध झाली. अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणाने बाहेरून आलेले पर्य

डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणाऱ्या औषधांव्यतिरिक्त इतर औषधांची जाहिरात करता येणार नाही- डॉ. भारती पवार

इमेज
डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणाऱ्या औषधांव्यतिरिक्त इतर औषधांची जाहिरात करता येणार नाही- डॉ. भारती पवार                 औषधांविषयीच्या जाहिरातींचे नियमन, औषधे आणि जादुई प्रभाव असणारे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ अंतर्गत केले जात असून राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियमन १९४५  मध्ये  २०१५ साली दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानुसार, एच, एच-१ आणि एक्स या सूचीत समाविष्ट औषधे (म्हणजेच केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी औषधे) यांची जाहिरात करता येत नाही. असे करायचे असल्यास, केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. जर या अटीचे पालन केले नाही, तर अशा उत्पादकांवर कारवाई करण्याचे अधिकार, राज्यातील परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला आहेत.       दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती आणि त्यामुळे जनतेच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन, आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावर,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १२ जून २०१७ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना, ज्या औषधी उत्पादनांसाठी आयुष अथवा राज्यातील औ

५७५ ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून ५५ कोटी रुपयांचे वितरण !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पेसा ५% अबंध निधीचे जिल्हास्तरावरून ५५ कोटी ८६ लक्ष वितरण !           नाशिक - सन २०२१-२२ वर्षात आदिवासी बहुल ९ तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०२१-२२ अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , नाशिक द्वारा  जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे कडील निधी वितरण आदेशानुसार एकत्रित प्राप्त निधी  ५५ कोटी ८६ लक्ष २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या प्रमाणात निधी थेट पेसा ग्रामपंचायतीना वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. नाशिक जिल्हातल्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% अबंध निधी योजनेचा निधी  २४ मार्च २०२२ रोजी थेट ग्रामपंचायतींना वितरित होत असुन यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा या नऊ तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असुन १४७९ गावांना या निधीचा लाभ होणार आ

शिवाजी चुंभळे यांना मानाची गदा मान्यवरांच्या हस्ते प्रदान

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा दांडेकर दीक्षित तालीम संघाच्या वतीने शिंमगा कुस्ती दंगल निमित्ताने क्रीडा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न." शिवाजी चुंभळे यांना मानाची गदा प्रदान !      नासिक (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला १६५ वर्षांची परंपरा लाभलेला नासिक शहरातील दांडेकर दीक्षित तालीम संघाचा शिमगा कुस्ती दंगल पुरस्कार प्रदान करण्यात आले.         कोरोना महामारीमुळे दोन वर्षे स्पर्धा व पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते, चार वर्षांपूर्वी त्यात नविन प्रथा सुरू झाली आहे. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, कामगिरी करणाऱ्या जुने पहीलवान कुस्तीगीर कुस्ती प्रेमी यांची निवड करुन त्यास शिमगा कुस्ती दंगल मध्ये आमंत्रित करून, नासिक शहर जिल्हा तालीम संघाचे माजी अध्यक्ष खासदार आमदार क्रीडा महर्षी कै. उत्तमराव ढिकले यांचे नावाने क्रीडा महर्षी उत्तमराव ढिकले क्रीडा गौरव पुरस्कार बहाल करण्यात येतो. सन २०२२ चा पुरस्कार जुने कुस्तीगीर व नासिक शहर तालीम संघाचे माजी अध्यक्ष पहीलवान काका साहेब खंडेराव मुळाणे यांना मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. तसेच मानाची गदा ग्रामीण भागात कुस्ती वाढविण्यासाठी

शिवजयंती निमित्ताने ५१ युवकांचे रक्तदान तर ३५० नागरीकांची आरोग्य तपासणी !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग !             मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चिल्ड्रन्स हेल्प अँड हेल्पेज फाउंडेशन, आर.एम.एस. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयसीयू, आयसीसीयू लाईफ मोनीटर्ड वेल व सायन हॉस्पिटल ब्लड बँक व मराठे शाही ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व  विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर, गोवंडी येथील इमारत क्र. १७ ब, संस्कृती सोसायटी, म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई येथे संपन्न झाले.          मराठे शाही ग्रुप व स्थानिक नागरिकांनी मिळून एकंदरीत ५१ युवकांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिरात ३५० नागरिकांनी, डोळे तपासणी, ईसीजी, शारीरिक तपासणी करून घेतली. मराठे शाही ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदी वातावरणात शिबिर संपन्न केले.  या शिबिराला, विशेष सहकार्य रक्तदान दाते, साई भाई रामपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते तसेच संजय इंदप यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.