छगन भुजबळ यांच्याकडून रेशन दुकानदाराचे कौतुक ! आय एस ओ प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना !!


न्यूज मसाला वृत्तसेवा,

7387333801

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट !

आयएससो नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी !

मुळशी,पुणे,दि.२७ मार्च :-  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दौऱ्यावर असतांना त्यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पाहणी केली.
       यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याने सदर रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्यात यावे अशा सूचना करत रेशन दुकानदार प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक करत आपले काम सुरु ठेवावे अशा सूचना दुकानदारास त्यांनी केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !