पोस्ट्स

प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करणार्‍या लोकशाही आघाडीची २० जून रोजी विभागीय बैठक !

इमेज
प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करणार्‍या लोकशाही आघाडीची नागपूरमध्ये २० जून रोजी विभागीय बैठक !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मागासवर्गीयांना न्याय देण्यात कमी पडले आहे. फुले-शाहू-आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मागासवर्गीयांची, बहुजनांची मते घेऊन ह्या पक्षांनी सत्ता मिळवली आहे. मात्र ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळू नये, असा ह्या प्रस्थापित पक्षांचा डाव आहे. म्हणून एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या पदोन्नतीतील आरक्षण दोन्ही पक्षांनी असेच अडकवून ठेवले आहे. ओबीसींना पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्यासाठी २००६ ला कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सवलती, सरकारी नोकरीतील लाखांचा शिल्लक असलेला अनुशेष, खाजगीकरण कंत्राटीकरण, कोतवालांना चतुर्थ श्रेणी नाकारणे, कामगार विरोधी कायदे, गगनाला भिडणारी महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव शंभरावर कधीच गे

देहू येथील शिळा मंदिराबद्दल माहिती !

इमेज
देहू येथील शिळा मंदिराबद्दल माहिती !     पुणे::-१७ व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला.             विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम यांनी ज्या शिळेवर बसून १३ दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित करण्यात आले आहे. पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.            या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी केले.          १७ व्या शतकात होऊन गेलेले भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्या

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढवय्यांचे नव्या पिढीने स्मरण ठेवावे – अनिल गणाचार्य, कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांचा सत्कार !

इमेज
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढवय्यांचे नव्या पिढीने स्मरण ठेवावे – अनिल गणाचार्य कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांचा सत्कार ! मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या तीन पिढ्या तुरुंगात होत्या, ते स्वतः नाशिक रोड, त्यांची पत्नी आशालता सोबत लहान मुलगी जयश्रीसह ऑर्थर रोड, भाऊ प्रभाकर येरवडा तर आई साबरमती कारागृहात यातना सहन करत होत्या, अशा या चळवळीत सर्व लढवय्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा त्याग, समर्पण नव्या पिढीने कायम लक्षात ठेवले पाहिजे, असे विचार त्यांचे सुपुत्र अनिल गणाचार्य यांनी व्यक्त केले.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लढलेल्या घराण्याच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघात आचार्य अत्रे यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या पुढाकाराने अत्रेय संस्था तसेच मनिषा प्रकाशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार आणि संयुक्त महाराष्ट्राचे नेते उद्धवराव पाटील यांचे नातू अविष्कार पाटील, कै. प्रभाकर पाटील यांची मुलगी म

जिल्हा परिषदेत पूर्व व पश्चिम या ऐवजी एकच लघु पाटबंधारे विभाग !

इमेज
जिल्हा परिषदेत पूर्व व पश्चिम या ऐवजी एकच लघु पाटबंधारे विभाग जिल्हा संधारण अधिकारी लघु पाटबंधारे यांचे अंतर्गत जिल्ह्यात सात उपविभाग होणार कार्यरत नाशिक - शासन निर्णय क्र. आस्थाप २०२२/प्र.क्र.१४०/जल-२ दिनांक २६ मे २०२२ नुसार पुर्नस्थापीत करण्यात येत असलेल्या सात उपविभाग व त्या उपविभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच यापुर्वी कार्यरत असलेले लघु पाटबंधारे (पुर्व /पश्चिम) विभाग जिल्हा परिषद नाशिक ऐवजी एकच कार्यालय ठेवण्यात आलेले असून सदर कार्यालय "जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नाशिक" या नावाने पुर्नस्थापीत करण्यात आलेले आहे.         लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत कार्यरत सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांचे यांचे समायोजन करुन पुर्नस्थापनेने पदस्थापना देण्यात आलेले आहे. त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक, वाहनचालक, परिचर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात आलेले असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे शासन आदेशाचे अधिनस्त राहून तात्पुरते स्वरुपात तालुका निहाय जिल्हा परिषद अधिन

डॉ. विजय दहिफळे साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित !

इमेज
डॉ. विजय दहिफळे साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित ! नाशिक । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेक्सॉलॉजिस्ट, एन्ड्रॉलॉजिस्ट आणि युरॉलॉजिस्ट डॉ. विजय दहिफळे यांना साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. दुबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात डॉ. दहिफळे यांचा गौरव करण्यात आला.              याप्रसंगी अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी डॉ. दहिफळे यांना पुरस्कार प्रदान केला. साम टीव्हीचे बिझनेस हेड अमित सिंग तसेच साम टीव्हीचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. डॉ. विजय दहिफळे यांनी आजवर लैंगिक समस्यांचा सामना करणार्‍या लाखो जोडप्यांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले आहे. साम टीव्हीवर सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे. या मालिकेतून समुपदेशन करून सुखी जीवनाचा मंत्र, लैंगिक शिक्षण, जागृती, आणि सुरक्षा यांवर ते देश-विदेशात मार्गदर्शन करतात. याविषयी मराठी, हिंनदी आणि इंग्रजी भाषांतील त्यांची पुस्तकेदेखील जगभरात वाचली जातात.             आज समाजात धकाधकीचे जीवन

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे जिल्हास्तरीय जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !

इमेज
कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे जिल्हास्तरीय जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ! नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना व अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हब यांच्या संयुक्त विद्यमाने, १० वी, १२ वीत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व शिक्षक सन्मान सोहळा, विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, जुनच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय " जीवनगौरव, आदर्श शिक्षक व युवा आदर्श शिक्षक पुरस्कारांची " घोषणा आज संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व सपकाळ नॉलेज हब चे संचालक रविंद्र सपकाळ यांनी केली.          यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार, ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केलेले व उद्धव अकॅडमी चे संचालक सुधीर गायधनी यांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये, परांजपे संस्कृत क्लासेस च्या संचालिका सुषमा परांजपे, नील काबरा अकॅडमीच्या विशाखा काबरा, ब्रिलीयन्स अकॅडमीचे अमिर शेख, परांजपे प्रोफेशनल अकॅडमीचे कौस्तुभ परांजपे, आयडियल

१७ जूनला कसा असेल "अॅसिड व्हिक्टीम" "आठवा रंग प्रेमाचा" !

इमेज
१७ जूनला कसा असेल "अॅसिड व्हिक्टीम" "आठवा रंग प्रेमाचा"  चित्रपटातील रिंकूचा वेगळा लूक बघायला मिळणार ! - १७ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला  काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे.             अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी  "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांचे असून यांनी "क्युं हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर "यमला प