पितापुत्र रंगवतात सुरेख वारली चित्रे ! वडिलांप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड परदेशवारी साठी मुलाचीही इच्छा !!
पितापुत्र रंगवतात सुरेख वारली चित्रे ! वारली चित्रशैली जशी कलावंतांच्या मनाला आनंद देते, तशीच ती त्यांच्या पोटाला घासही देते. डहाणू तालुक्यातील रायतळी या पाड्यावर राहाणारे नथू सुतार उत्तम वारली कलाकार आहेत. अनेक वर्षांपासून शेती कसतानाच ते सुंदर वारली चित्रे रंगवतात. त्यांचा मुलगा सुभाष त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन वारली चित्रे रेखाटतो. तो म्हणतो, "चारपाच महिने शेतीचे काम असते. उरलेल्या दिवसांमध्ये वडील व मी वारली चित्रे रंगवतो. त्यावर वर्षभर आमचा उत्तम उदरनिर्वाह होतो." आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यातर्फे दि.२७ ते ३१ मे दरम्यान नाशिकला आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आदिवासींच्या कलात्मक वस्तूंची दालने मांडण्यात आली. सहभागी होण्यासाठी वारली कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आले. सुभाष सुतार आपली सुंदर वारली चित्रे घेऊन आला होता. ५० रुपयांच्या ग्रीटिंग कार्डपासून ५ हजार रुपयांच्या भव्य वारली पेंटिंगपर्यंत अनेक चित्रे त्याच्या दालनात सजली होती. सुभाषशी संवाद साधला असता तो म्हणाला, "१८ वर्षांपूर्वी मी वडिलांकडे वारली चित्रकला शिकलो. त्य