पोस्ट्स

अभिनव कल्पनांमुळे उद्योजकांना प्रेरणा- केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानुप्रतापसिंह वर्मा यांचे प्रतिपादन.आर.डी. इन्फ्राचे राहुल देशमुख यांना इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स सन्मान !

इमेज
अभिनव कल्पनांमुळे उद्योजकांना प्रेरणा- केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानुप्रतापसिंह वर्मा यांचे प्रतिपादन. आर.डी. इन्फ्राचे राहुल देशमुख यांना इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स सन्मान !        नवी दिल्ली::- कनझूमर अँड इंडस्ट्रीज तर्फे इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स या पारितोषिकाने सुप्रसिध्द उद्योजक आरडी इन्फ्रा इक्विपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक राहुल देशमुख यांना  केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानूप्रतापसिंह वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.          या प्रसंगी व्यासपीठावर जमैकाचे राजदूत जासान हॉल, गयाणाचे राजदूत प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.         दिल्ली येथील ताज पॅलेस येथे आशिया आफ्रिका बिझनेस अँड सोशल फोरम तर्फे झालेल्या कार्यक्रमात ना. वर्मा म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे. यामुळे व्यापार उद्योगांना चालना मिळते आणि नव उद्योजकांना प्रेरणा देणारे ठरते असे सांगीतले. याप्रसंगी राहुल देशमुख यांनी सांगितले की सातत्याने अभिनव संकल्पनांचा पाठपुरावा केला तर उद्योगात यशस्वी होता येते. निर्यातक्षम उद्योगांच्या वि

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या ‘जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे यांना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर !

इमेज
जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे यांना नेशन बिल्डर अवार्ड  जाहीर !  वाबळेवाडी शाळेच्या  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ता.०३ (पुणे प्रतिनिधी)::- वाबळेवाडी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक बबनराव खैरे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड  नुकताच जाहीर झाला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष विरधवल करंजे, सचिव डॉ. मिलिंद भोसुरे आणि पब्लिक इमेज डायरेक्टर मनोहर परदेशी यांनी नुकतीच दिली.        रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. समाजात उत्कृष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करत असते. दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जिल्हा परिषद शिक्षणाधिकऱ्यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवार्ड  देऊन सन्मानित करते. यावर्षीही संस्थेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.              राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली

अपरिहार्य कारणास्तव दोन वेळा रद्द झालेले अधिवेशन आता १९, २० नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड येथे होणारच- देशमुख

इमेज
 अपरिहार्य कारणास्तव दोन वेळा रद्द झालेले अधिवेशन आता १९, २० नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड येथे होणारच- देशमुख     मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन आता १९,२० नोव्हेंबर रोजी पिंपरी - चिंचवड येथे होणार-एस.एम देशमुख        पुणे दि. २ : मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी - चिंचवड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली.       मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कृषी महाविद्यालयात आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते शरद पाबळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी एस.एम देशमुख बोलत होते. कार्यक्रमास राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.       सलग दोन वेळा काही अपरिहार्य कारणास्तव अधिवेशन रद्द करावे लागले होते त्यामुळे राज्यातील पत्रकारांची जी गैरसोय झाली त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी दिलगीरी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडचे अधिवेशन ठरलेल्या तारखेला होईल आणि त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१५ मध

बाल विकास सेवा योजना प्रकल्पांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव !

इमेज
राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ शुभारंभ बाल विकास सेवा योजना प्रकल्पांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव नाशिक - सन २०१८ मध्ये मा. पंतप्रधान कार्यालयाचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येते.         महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो व या उपक्रमांद्वारे जन आंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केला जातात. या वर्षी सप्टेंबर २०२२ हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले असून सदर कार्यक्रमात लोकांचा सक्

४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !

इमेज
४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण ! पिंपळगाव बसवन्त येथील  व्यंकटेश बालाजी मंदिर    श्री बालाजी हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो.  मनापासून प्रार्थना केली तर भगवान बालाजी नक्कीच इच्छापूर्ती करतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्याचेच प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन्त येथील बालाजी भक्तांना आले. ४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले मंदिर उभारणीचे स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातून पूर्ण झाले. हा चमत्कार बालाजीच्या कृपेनेच घडला, यात शंका नसल्याची भावना महेशनगरवासीयांची आहे.    पिंपळगाव बसवन्त हे नाशिक जिल्ह्यातील संपन्न गाव. बागायतदार शेतकरी द्राक्ष, कांदा पिकवतात. अनेक जातिधर्मांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. येथील माहेश्वरी समाजातील काही जणांनी गावात भगवान बालाजीचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडली. कारण तिरुपती बालाजीवर श्रध्दा असली तरी सर्वसामान्य भाविकांना लांबचा प्रवास करून तेथे जाणे शक्य होतेच असे नाही. म्हणून तसेच मंदिर उभे करण्याचा संकल्प

४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !

इमेज
४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण ! पिंपळगाव बसवन्त येथील  व्यंकटेश बालाजी मंदिर    श्री बालाजी हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो.  मनापासून प्रार्थना केली तर भगवान बालाजी नक्कीच इच्छापूर्ती करतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्याचेच प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन्त येथील बालाजी भक्तांना आले. ४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले मंदिर उभारणीचे स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातून पूर्ण झाले. हा चमत्कार बालाजीच्या कृपेनेच घडला, यात शंका नसल्याची भावना महेशनगरवासीयांची आहे.    पिंपळगाव बसवन्त हे नाशिक जिल्ह्यातील संपन्न गाव. बागायतदार शेतकरी द्राक्ष, कांदा पिकवतात. अनेक जातिधर्मांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. येथील माहेश्वरी समाजातील काही जणांनी गावात भगवान बालाजीचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडली. कारण तिरुपती बालाजीवर श्रध्दा असली तरी सर्वसामान्य भाविकांना लांबचा प्रवास करून तेथे जाणे शक्य होतेच असे नाही. म्हणून तसेच मंदिर उभे करण्याचा संकल्प

नासिकच्या युवा उद्योजकाचा सन्मान करणार माॅरिशसचे राष्ट्राध्यक्ष ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय अचिव्हमेंट अवाॅर्ड घोषित !!

इमेज
मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष करणार नाशिकच्या आबासाहेब थोरात यांचा गौरव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड घोषित नाशिक (प्रतिनिधी) ::-नाशिक येथील युवा उद्योजक, इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड युनोव्हेटीव सोल्युशन्सचे डायरेक्टर आबासाहेब वामनराव थोरात यांना मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनच्यावतीने नुकताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड’ घोषित करण्यात आला असून, हा अवॉर्ड मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते श्री. थोरात यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड युनोव्हेटीव सोल्युशन्सच्या सीईओ स्वप्ना आबासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आबासाहेब थोरात उपस्थित होते.                या पुरस्काराविषयी सांगताना स्वप्ना थोरात म्हणाल्या की, ‘पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संम्मेलने आयोजित केली जात आहेत. याची दखल मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनने घेत मॉरिशसमध्ये अशाप्रकारचे साहित्य संम्मेलन आयोजित केले जावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार म